शेवगा या झाडाची पाने, फळं, फुले,साल, आणि मुळे या सर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उपचारात केला जातो. बियांपासून तेल सुद्धा काढले जाते आणि पानांपासून भाजी बनवू शकतो. आज आपण शेवग्याच्या पानाबद्दल माहिती घेणार आहोत.
शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6 , व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह असे घटक असतात. शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक कॅल्शियम असते. शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात.चला तर जाणुन घेउयात शेवग्याच्या पानाचे फायदे.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यास फायदा मिळेल. शेवग्याची पाने प्रथिनाचा उत्कृष्ट स्रोत आहेत.रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.
शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज घालवन्यासाठी ही केला जातो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम मिळतो. वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप बनवून प्या. नियमित प्यायल्यास चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल.
डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोके दुखी कमी होण्यास मदत मिळू शकते. शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यास ही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या शेंगा आणि पानाचा आहारात समावेश केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळू शकते.
आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असल्यास आपण शेवग्याच्या पानाच्या रसात चमचाभर मध मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. तीस मिनिटे राहूद्या नंतर धुऊन टाका. हा उपाय केल्याने काही दिवसात आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
शेवग्याच्या पानांमध्ये फायबर असते याच्या सेवनाने बद्धकोष्ठतापासून मुक्त होता येइल. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते.
लहान मुलांच्या पोटात कृमी झाल्यास त्यांना शेवग्याची भाजी खायला दिल्याने कृमी विष्टेवाटे बाहेर निघून जाते. शेवग्याची पाने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल पातळी देखील संतुलित करतात.
शेवग्याची पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिन कमी असलेल्याना याचा फायदा होऊ शकतो. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
शेवग्याची पानामध्ये विटामिन ए असत जे डोळ्यांसाठी खुप चांगल असत. शेवग्याच्या ताज्या पानांचे पोटीस करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.
शेवग्याची पानामध्ये झिंक असते. जे केसांसाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या पानांची भाजी खाल्याने केस गळती कमी होण्यास मदत होईल. शेवग्याच्या पानांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी सुद्धा होतो.
आपल्याला शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: फार्मइजी ब्लॉग