- आरोग्य

पाठीच्या खालच्या भागात होणाऱ्या (LOWER BACK PAIN) ‘वेदना कमी करण्यासाठी’ घरगुती उपाय

कंबरदुखी सहसा वयाच्या चाळीशी नंतर होणारा आजार परंतु आजकाल फास्ट फूड, व्यायाम न करण्याची सवय, आहारात कॅल्शीयमचा अभाव तसेच एका जागेवर बसून काम करण्याची सवय यामुळे तरुण वयातच कंबर दुखी सुरु होताना आपल्याला दिसून येते.

बऱ्याचवेळा कमेंट मध्ये सुद्धा आपण LOWER BACK PAIN साठी घरगुती उपाय सांगा असे म्हटलं होत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. पाठीच्या खालच्या भागात ‘वेदना कमी करण्यासाठी’ घरगुती उपाय पाठीच्या खालच्या भागात वेदना का होतात हे समजून घेऊयात.

बऱ्याचवेळा आपण कोणतेही काम करायला बसताना वाकडे तिकडे, पाय पसरून बसतो यामुळे कंबरेमधील स्नायूवर दबाव निर्माण होतो. म्हणूनच इथून पुढे बसताना विशेष काळजी घ्या.

जमिनीवर बसत असाल तर भारतीय बैठक म्हणजेच मांडी घालून बसा, आणि खुर्चीत बसणार असाल तर टेबल वर पाय ठेवून बसू नका. याच बरोबर एका जागेवर जास्त वेळ बसून राहू नका. जड वस्तू उचलण्यासाठी इतरांची मदत घ्या. पाठीच्या खालच्या भागात वेदना होत असल्यावर कोण कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात या विषयी जाणून घेऊयात.

पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यासाठी आपण तुळशीच्या पानाचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम मुठभर तुळशीची ताजी पाने घ्या. एक ते दीड ग्लास पाण्यात ती मिक्स करून गॅस वर मंद आचेवर उकळून घ्या. पानाचा अर्क पाण्यात उतरला कि ते पाणी जरासे थंड होऊ द्या. मग ते पाणी प्या. हा उपाय काही दिवस केल्यावर आपल्याला फरक दिसून येईल.

पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यासाठी आपण सैंधव मिठाचा वापर करू शकता. यासाठी आपण मुठभर सैंधव मीठ थोड्याश्या पाण्यात मिसळून हलकेसे गरम करून घ्या. घट्टसर पेस्ट आपल्या पाठीच्या खालच्या भागावर लावा. पाच ते दहा मिनिट राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. आपल्याला लगेच फरक दिसून येईल.

आपल्या आहारात गुळ शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असुद्या. या मध्ये कॅल्शियम असते जे आपल्या हाडांच्या मजबुती साठी आवश्यक असत.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *