- आरोग्य

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे

आपल्या शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी आपण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यायले पाहिजे हे तर आपल्याला माहित असेलच. परंतु जर आपण सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर त्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर पडण्यास मदत मिळते. वाढत्या वजनामुळे आपण चिंतीत असाल तर आपण हा सोपा उपाय करून बघायला हरकत नाही. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्या. हा उपाय अडीच महिन्यापर्यंत करा. आपल्याला फरक दिसेल.

आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसायला लागल्या असल्यास आपण सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्यायला सुरुवात केली पाहिजे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील आणि आपली त्वचा चमकदार दिसू लागेल.

बरेचशे पोटाचे आजार हे दुषित पाण्यामुळे होतात. जर आपण उकळून गार केलेले पाणी प्यायलो तर पोटाचे आजार होणार नाहीत. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते.

रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने सांधेदुखी कमी व्हायला मदत मिळते. जर आपला घसा काही कारणाने दुखत असेल, सर्दी झालेली असेल किंवा खोकला येत असेल तर आपण कोमट पाणी प्यायल्याने घसा मोकळा व्हायला मदत मिळते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *