- आरोग्य

पेरू खाल्ल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

पेरू हे अस एक फळ आहे जे जवळजवळ प्रत्येकाला खायला आवडत. पेरू हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यास अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. आज आपण जाणून घेणार आहोत पेरू खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे.

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. पेरूचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक फायबर घटक असतात. त्यामुळे पेरू पचायला हलके असतात.

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. पेरूचे सेवन केल्याने नजर तीक्ष्ण होण्यास मदत मिळते. पेरूचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोलची पातळी कमी व्हायला मदत मिळते.

पेरूचे सेवन मधुमेहाचे रुग्ण हि करू शकतात. पेरूच्या पानांपासून बनवलेली पेस्ट वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या टाळता येतात. आपल्या तोंडाला आतून फोड आल्यावर पेरूची कोवळी पाने चावा. पेरूची पाने तोंडाच्या अल्सरसाठी अतिशय फायदेशीर मानली जातात.

तोंडाला दुर्गंधी येत असल्यास पेरूची पाने चावून थुंका असे केल्याने तोंडाची दुर्गंधी जाईल. आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *