- आरोग्य

चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु वातावरणातील धूळ, प्रदूषण, ऊन, केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर, कामाचा ताण यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो.

आपली त्वचा काळपट दिसू लागते. आहारात तेलकट मसालेदार पदार्थांचा अती प्रमाणात समावेश असल्यास चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय.

चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण दह्याचा वापर करू शकता. दहयामध्ये लैक्टिक एसिड असते जे एक नैसर्गिक ब्लीच आहे. हातावर थोडेसे दही घेऊन त्याने चेहऱ्यावर मालिश करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला फरक दिसेल.

दुधामध्ये नैसर्गिक पोषकतत्वे असतात. चेहरा उजळवण्यासाठी आपण दुधाचा वापर करू शकता. यासाठी 1  चमचा दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा.  10 ते 15 मिनिट चेहरा सुकून द्या त्यांतर पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परीणामाठी असे आठवड्यातून दोनवेळा करा.

चेहरा गोरा करण्यासाठी चंदन पावडरचा वापर आपण करू शकता यासाठी 2 चमचे चंदन पावडरमध्ये थोडेसे गुलाबजल मिसळून हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. आणि सुकून द्या सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. आपल्याला फरक दिसेल.

चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी सुकवलेली संत्र्याची साल मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. 2 चमचे संत्र्याच्या सालीची पावडर एका छोट्या वाटीत घ्या. त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा.

हलक्या हाताने आपला चेहरा चोळा. त्यांतर 10 मिनिटांनी आपला चेहरा धुऊन टाका. असे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाऊन आपला चेहरा परत पूर्वीसारखा चांगला दिसू लागेल.

चेहरा गोरा करण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी एक पिकलेला टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने तो आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारणपणे 15 मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुऊन टाका चांगल्या परिणामासाठी हा उपाय आपण आठवड्यातून 3 वेळा करू शकता.

चेहरा गोरा करण्यासाठी आपण दररोज थोडा वेळ वाफ घ्या, वाफ घेतल्याने चेहऱ्यावर जमा झालेले लहान लहान धुळीचे कण तसेच चेहऱ्यावरील सर्व घाण खोलवर साफ होईल. चेहऱ्यावरील मुरूम कमी होतील चेहरा साफ ताजातवाना दिसू लागेल. रोज 3 ते 4 लीटर पाणी प्या ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील. आणि आपला चेहरा ताजातवाना दिसू लागेल.

नियमित व्यायाम करा. व्यायाम करताना आपल्याला घाम आल्याने आपल्या शरीरावरील रोमछिद्रे मोकळी होण्यास मदत होईल. आणि आपल्या त्वचेवर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. तणाव मुक्त राहा आणि चांगली झोप घ्या.

खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून लांब राहा. अती तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नका. हे उपाय तुमचा रंग साफ आणि गोरा करण्यात बऱ्याच प्रमाणात मदत करू शकतात, परंतु त्यांना थोडा वेळ लागू शकतो.

आपल्याला चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *