- आरोग्य

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सूजलेला दिसत असल्यास करा घरगुती उपाय

रात्री व्यवस्थित झोप न झाल्याने, अती मद्यपान केल्याने, कामाची दगदग, चिंता, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने, सकाळी झोपेतून उठल्यावर आपला चेहरा सुजल्या सारखा दिसू लागतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सूजलेला दिसत असल्यास आपण काय घरगुती उपाय करू शकतो.

सकाळी चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्यावरचे स्किन पोअर्स घट्ट होतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी होण्यास मदत मिळते.

सकाळी चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी काही बर्फाचे तुकडे एका सुती कपड्यात गुंडाळून चेहऱ्यावर हलक्या चोळा. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत मिळते.

सकाळी चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. सकाळी शारीरिक कसरतीचा व्यायाम करा. शरीराला घाम सुटल्याने घामाद्वारे शरीरातील टॉक्सिन्स त्वचेबाहेर टाकली जातात. चेहऱ्यावरची सूज कमी होते.

सकाळी चेहऱ्यावर सूज येऊ नये यासाठी सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने लघवी द्वारे शरीतील टॉक्सिन बाहेर टाकले जातील. आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *