- आरोग्य

मुतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय

किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे जो रक्ताची स्वच्छता करतो आणि मूत्रमार्गातून यूरिया, आणि इतर अनेक प्रकारच्या हानिकारक पदार्थांना मुत्रावाटे बाहेर काढून टाकण्याचे कार्य करत असते.

कमी पाणी पिण्याची सवय असल्यास, लघवीला लागली तरी हि वेळेवर लघवीला न जाणे, अती क्षारयुक्त पाणी पिणे, मद्य पान करण्याची सवय असणे,  यामुळे मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन होऊ शकतो.  मुतखडा लहान आकाराचा असल्यास तो कोणत्याही त्रासाशिवाय लघवीवाटे बाहेर पडू शकतो. यासाठी आपण काही घरगुती उपायांची माहिती आज घेणार आहोत.

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असते. आपण हे ऐकलं असेलच की आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते.  पाण्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते. अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते.

आपण जितके जास्त पाणी पिऊ तितके जास्त शरीरातील विषारी घटक मूत्रमार्गावाटे शरीराबाहेर जातील.  एका सामान्य व्यक्तीने दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी प्यायला हवे. आणि जर आपल्याला मुतखडा असेल तर लहान आकाराचे खडे लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यासाठी आपण जास्त पाणी प्यायले पाहिजे.

मुतखडा लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी सकाळी पानफुटीची 2 ते 3 पाने खा. असे केल्याने मुतखडा बारीक कण होऊन लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत मिळते. सकाळी थोडासा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मूतखडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत मिळते.

मुतखडा लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी नियमित सकाळी ग्लासभर डाळिंबाच्या रसाचे सेवन करा. मुतखडा लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी आपण सकाळी कपभर गहू अंकुराचा रस पिऊ शकता असे केल्याने मुतखडा बारीक कण होऊन लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत मिळते.

मुतखडयाचा त्रास असल्यास केळ्याच्या सेवनाने आराम मिळू शकतो. केळी मध्ये विटामिन बी 6 हे असते. ज्यामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. म्हणून आपल्याला मुतखडयाचा त्रास असल्यास आपण सकाळी 2 केळी खाऊ शकता.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: मेडिकली रिव्यू करण्यात आलेला हेल्थलाईन ब्लॉग. कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *