- आरोग्य

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल वजन वाढणे हि एक गंभीर समस्या झालेली आहे. वजन जास्त वाढल्यास खूप साऱ्या आजारांना आमंत्रण आपण देत असतो. बैठे काम केल्याने, तेलकट, मैदायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने, जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्याने, सतत कोल्ड ड्रिंकचे सेवन करणे, एकंदरीत शारीरिक हालचाल न केल्याने आपले वजन वाढते.

आज आपण काही घरगुती उपायांच्या मदतीने आपले वजन कसे कमी करता येईल याची माहिती घेणार आहोत. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारापासून सुरुवात करावी लागेल.

सर्वसाधारणपणे एका निरोगी माणसाला दिवसभरात साधारणपणे 2,500 कॅलरीज लागतात. तर स्त्रीयांना 2,000 कॅलरीजची गरज असते. आपण दिवसभरात घेत असलेल्या आहारात मधून आपल्याला किती कॅलरीज मिळतात हे जाणून घेण्यासाठी आपण कॅलरीज काउंटर अप्लिकेशन घेऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून घेऊ शकता. असे केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत मिळेल. सकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचा रस, सलाड, मोड आलेले कडधान्य अशा पदार्थांचा समावेश करा.

दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि भाजी खा. जेवण झाल्यानंतर एक ग्लासभर ताक घ्या. शक्य झाल्यास मठ्ठा घेतला तरी हि चालेल. मठ्ठा किंवा ताक न मिळाल्यास आपण नारळाचे पाणी हि घेऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यात छोटासा दालचिनीचा तुकडा उकळून घ्या. हे पाणी कोमट असतानाच प्या. दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते, वजन नियंत्रणात आणून प्रतिरोधक क्षमतेमध्ये सुधार येतो.

वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून दोन वेळा तरी कोरफड ज्यूस प्या. कोरफडाचा ज्यूस प्यायल्याने आपली चयापचय शक्ती सुधारते. आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या. अपल सायडर व्हिनेगर आपले मेटाबोलीझम सुधारण्यास मदत करते तसेच आपले वजन हि कमी होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अति गोड पदार्थ, कोल्डड्रिंक ह्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश करू नका. ह्या गोष्टीचा आहारात समावेश केल्यानेच आपले वजन वाढत असते.

वजन कमी करण्यासाठी आपण दिवसातून दोन वेळा ग्रीन टी घ्या. ग्रीन टी प्यायल्याने चयापचय दर सुधारयला मदत मिळते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार घ्या. म्हणजेच कडधान्याची उसळ, पालेभाज्या यांचा समावेश असुद्या.

दररोज पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होईल आणि अतिरिक्त फॅट जमा होणार नाही. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप घ्या. जेणेकरून आपल्या शरीरात अतिरिक्त फॅट जमा होणार नाही.

वजन कमी करण्यासाठी आहारा बरोबरच आपल्याला थोडे तरी शारीरिक श्रम करणे गरजचे आहे. सकाळी 10 ते 15 मिनिट चालयला जा. अथवा दोरीवरच्या उड्या मारा, व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करणे शक्य असेल तर थोडा वेळ का होईना व्यायाम करा, शक्य झाल्यास रात्री जेवणानंतर शतपावली करा. काही न जमल्यास आपल्या घरातील जीना वापरा करा.

आपल्याला वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. रेफ: हेल्थलाईन ब्लॉग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *