- आरोग्य

वातावरणातील बदलामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय

वातावरणातील बदलामुळे आता थोड्या दिवसातच थंडी चालू होईल. थंडीमध्ये आपले ओठ आणि हात फुटतात. थंडीतील ही एक सामान्य समस्या आहे. चेहऱ्याची त्वचा ही तर सर्वात नाजूक असते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

थंडीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा आपला चेहऱ्यावर, हातावर काळपटपणा येऊ शकतो. थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. चला तर मग पाहूया काय आहेत या टिप्स.

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आपली त्वचा कोरडी पडू नये यासाठी तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नियमित योग्य वेळेत योग्य पाणी पिणे फायद्याचे असते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी पिले जात नाही. परंतु हिवाळ्यात हि आपल्या शरीराची पाण्याची गरज तेवढीच असते.

त्वचा कोरडी पडू नये यासाठी आपण दुधाच्या सायीचा हि उपयोग करू शकता. दूधावरील सायही कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. दूधावरील सायीमध्ये स्निग्धता असल्यामुळे त्वचेवरील रखरखितपणा कमी होण्यास मदत होते.

रात्री झोपताना त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी हातापायांना खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलामुळे त्वचा मऊ पडते आणि त्वचा फुटत नाही. खोबरेल तेलामध्ये असणारे गुणधर्म आपल्या त्वचेचे रक्षण करतात आणि आपली त्वचा कोरडी पडत नाही.

केळी फक्त शरीरासाठीच नाहीतर त्वचेसाठीही उपयुक्त आहे. केळी आपल्या त्वचेसाठी चांगले मॉईश्चराईजर आहे. आपली त्वचा कोरडी असल्यास आपण एक पिकलेली केळी घ्या सोलून त्यामधील गर बारीक करून वाटीमध्ये घ्या. त्या नंतर ते आपल्या त्वचेवर लावा.

अर्धा तास राहूद्या त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला काही दिवसातच  फरक जाणवेल. केळ्यामध्ये व्हिटॅमीन सी, ए, पॉटेशिअम, कॅल्शिअम आणि कार्बोहायड्रेट्सचे भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्याला कोरड्या त्वचेपासून मुक्ती तर देतातच पण त्वचेचा अनेक प्रकारे फायदाही करतात.

थंडीच्या दिवसांमध्ये ओठ फुटण्याची समस्या जास्त असते. त्यामुळे तुम्ही रोज रात्री झोपताना ओठांना दुधाची साय लावा. दुधाच्या सायमुळे ओठ मऊ राहतात आणि ओठांचे थंडीपासून रक्षण होते. ओठ फुटणे थांबतात.

हिवाळ्यामध्ये सहसा अंघोळ करताना साबणाचा वापर करू नका. तसेच जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास आपली त्वचा जास्त कोरडी पडत नाही. तसेच साबणाचा वापर केल्यास आपली त्वचा जास्त कोरडी पडते. त्यामुळे सहसा गरम पाणी आणि साबणाचा वापर टाळा. त्यामुळे तुमची त्वचा काळपट पडणार नाही, फुटणार ही नाही.

आपल्याला थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *