- आरोग्य

रात्री शांत झोप लागण्यासाठी उपाय

दिवसभराच्या धावपळीतून रात्री शांत झोप मिळणे हे प्रत्येकाला हवं असतं. मनुष्याच्या आरोग्यानुसार दररोज किमान सात ते नऊ तास झोप काढणे महत्वाचे आहे. अपुरी झोप घेतल्याचा परिणाम मनुष्याच्या स्वभावावरही पडू शकतो.

अपुरी झोप घेतल्याने दिवसभर थकल्यासारखे वाटते, छोट्या छोट्या गोष्टीवरून चीड चीड होते, अन्न पचन व्यवस्थित होत नाही, बद्धकोष्ठता होऊ शकते, तेच जर व्यवस्थित आणि शांत झोप लागल्यास आपण सक्रिय आणि आनंदित राहू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की झोप ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिक गरज देखील आहे.

झोपण्याबाबत दोन प्रकारची लोकं आढळतात त्यातून पहिले असे असतात जे बेडवर पडताच क्षणी झोपी जातात तर दुसरे झोप न लागल्यामुळे त्रस्त असतात. तर मंडळी, आजचा हा लेख अश्याच लोकांसाठी आहे ज्यांना झोपेबद्दल समस्या उद्भवतात. चला तर मग जाणून घेऊया रात्री शांत झोप लागण्यासाठी काही उपाय.

सर्वप्रथम, शांत झोप लागण्यासाठी झोपेची वेळ ठरवा. सुरुवातीला, वेळेचं बंधन लागल्यास पुढे आपोआप त्यावेळी झोपण्याची सवय होईल. असं केल्याने झोप शांतही लागते आणि झोपण्यासंबंधी काही समस्या देखील जाणवत नाही.

झोप न लागण्याचं मुख्य कारण कामावरचं किंवा कुठल्याही प्रकारचं तणाव असू शकतं. अश्या स्थितीत, बेडवर जाण्यापूर्वी आपल्या आवडीचे संगीत किंवा गाणी ऐका किंवा आवडत्या विषयाचे पुस्तक किंवा इतर साहित्य वाचा, असे केल्याने मनाला शांती मिळेल, जे रात्रीच्या झोपेसाठी खूप उपयुक्त ठरेल.

रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दुधात एक चमचा मध टाकून ते प्यावे. याने पोट शांत होते तसेच असे केल्याने आपल्याला शांत झोप येण्यास मदत मिळेल.

नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवण्यासाठी  पुस्तक वाचा असे केल्याने सकाळी फ्रेश वाटेल  यासाठी झोपण्यापूर्वी एखादे सकारात्मक विषयाचे पुस्तक वाचा. रात्री झोपतांना दिवसभरात घडलेल्या गोष्टी विसरून जावे तसेच दुसऱ्या दिवसाच्याही वेळापत्रक बाबत विचार करू नये. हे सर्व केल्यानेही शांत झोप लागेल.

रात्री जेवण केल्यानंतर, पंधरा ते वीस मिनिटं स्वतःमध्ये चालण्याची सवय निर्माण करा. खरं तर चालण्याने झोप चांगली तर लागतेच सोबतच पचन प्रक्रिया देखील सुरळीत राहते. लक्षात ठेवा की जेवणानंतर किमान तीन तासांनंतर झोपलं पाहिजे. तर, यापद्धतीने दररोजचे नियोजन करावे.

रात्रीचं जेवणही शांत झोपेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. विशेष म्हणजे, रात्रीचं जेवण जास्त तेलकट आणि तिखट मिरचीचे नको. अश्या जेवणाने पोटातील जळजळपणा वाढतो आणि ज्याच्यामुळे झोपही उडते. रात्रीच्या शांत झोपेसाठी हलकं जेवण करावे.

शक्य झालं तर झोपण्यापूर्वी हलक्या हातांनी डोक्याला मॉलिश करा परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा की असं दररोज केल्याने ती सवय आपल्याला लागते म्हणून त्यावर नियंत्रणही असावे. हफ्त्यातून एक-दोन वेळा मॉलिश करणे पुरेसे आहे.

झोपतांना सैल आणि पूर्ण शरीर अर्थातच हात-पाय कव्हर होईल असे कपडे घालावे. सैल कपडे घातल्याने झोप शांत लागेल तसेच शरीर कपड्यांनी कव्हर असल्यामुळे मच्छर चावण्याचीही समस्या उद्भवत नाही. एक शेवटची गोष्ट ती म्हणजे बेडरूम मध्ये उजेड नको कारण कमी किंवा मंद प्रकाशात झोप चांगली लागते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *