- आरोग्य

दररोज सकाळी 10 – 15 मिनिट चालण्याचे फायदे

चालणे हा साधा आणि सोपा व्यायाम नियमित केल्यास या व्यायामामुळे मधुमेह आणि हृदय विकार यासारखे गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत मिळते. आज जाणून  घेऊयात दररोज सकाळी  10 -15 मिनिट चालण्याचे फायदे

चालणे कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा असा हा व्यायाम आहे. जर आपण वाढलेल्या वजनामुळे चिंतीत असाल तर तुम्ही दररोज 10 -15 मिनिट चालण्याचा व्यायाम करू शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहील.

दररोज सकाळी 10 -15 मिनिट चालण्याने शरीर तंदुरुस्त आणि चपळ होण्यास मदत मिळते. सकाळी चालण्याने शुध्द वातावरणातील ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळया उन्हातून मिळते. तसेच स्नायू मजबूत होतात. सतत काम करून आलेला थकवा नाहिसा होऊन जातो.

दररोज सकाळी चालण्याने चिडचिडे पणा आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याने वजन संतुलित राहण्यास मदत मिळते. दररोज चालण्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत मिळते.

नियमित चालण्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते. नियमित चालण्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. नियमित चालायची सवय असणाऱ्याना हृदयाविकार होत नाही.

तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, तणाव, जळजळ आणि मानसिक तणाव यापासून आपला बचाव होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते.

दररोज चालण्याने फुफुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. चालण्याने अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तुमची कार्यक्षमता वाढते. दररोज सकाळी चालण्याने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत मिळते.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *