- आरोग्य

छातीत जळजळ कमी होण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

अपुरी झोप, जेवणाच्या वेळेत अनियमितता, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, अति तेलकट मसालेदार अन्न खाणे, विरुद्ध आहार घेणे या अशा कारणांनी छातीत जळजळ व्हायला लागते. आज या लेखाच्या माध्यमातून जाणुन घेउयात छातीत जळजळ होत असल्यास कोणते घरगुती उपाय करता येतील.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात अति तेलकट, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ खाणे पूर्णपने थांबवा असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ होणार नाही. रात्री जागरण केल्याने बऱ्याचदा छातीत जळजळ होत असते त्यामुळे रात्री जागरण करणे टाळा.

जेवण करताना घाई करू नका. जेवण आरामात करा जेणेकरून प्रत्येक घास व्यवस्थित चावला जाईल. प्रत्येक घासासोबत पाचक रस व्यवस्थित मिसळला जाईल आणि अन्नाचे पाचन व्यवस्थित होईल. छातीत जळजळ होणार नाही.

दररोज जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा घ्या अन तो चावून न खाता तोंडात ठेवून चघळा. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.

दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक किंवा मठ्ठा प्या. त्यामुळे पचनशक्ती सुधारायला मदत मिळेल. सातत्याने छातीत जळजळ होत असल्यास कडकडीत उपवास करणे टाळा. जेवण झाल्यानंतर चिमुटभर भाजकी बडीशेप खाल्याने पाचनशक्ति सुधारण्यास मदत मिळते. आणि छातीत जळजळ होणार नाही.

जेवण झाल्यानंतर आवळा सुपारी, किंवा एक चमचा आवळ्याचा मोरावळा खा. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. सातत्याने छातीत जळजळ होत असल्यास आहारामध्ये शिळे पदार्थ, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळा. या पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो.

छातीत जळजळ होत असल्यास नारळाचे पाणी प्या. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. आपल्याला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *