- आरोग्य

शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखाल?

शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व नियमित मिळणे फार गरजेचे असते. कॅल्शियम हे आपल्या शरीरातील हाडे मजबूत ठेवण्याचे कार्य करते. शरीरातील हाडे आणि दातांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असते. हाडांचा विकास आणि मजबूतीसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. आज आपण जाणून घेणार आहोत.

शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखायची. आपल्या शरीराला साधारण एक हजार मिलीग्राम्स इतकी कॅल्शियमची रोज  आवश्यकता असते. गर्भवती महिला, किंवा बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ही गरज 1200 ते 1300 मिलीग्राम पर्यंत असते.

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास चालताना किंवा जिने चढताना, धावताना, स्नायूंमध्ये थोड्याश्या श्रमांनी देखील क्रँप्स येऊ लागतात. ज्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते अशा व्यक्तीला हाडांच्या तुटण्याचा धोका असतो.

जर तुम्हाला सतत अंग दुखणे अथवा थकवा जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते. हातापायांच्या बोटांना मुंग्या येणे, बोटे सुन्न होणे हे ही कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

केसांच्या वाढीमध्ये कॅल्शियमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि कोरडे होते. आपल्याला अशी समस्या जाणवत असल्यास ते शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

कॅल्शियमची कमतरता सातत्याने असल्यास हृदयाचे ठोके अनियमित गतीने पडू शकतात. कॅल्शियमची कमतरतेमुळे दात कमकुवत होऊ लागतात दात किडणे हे पहिले लक्षण आहे. एकदा दात खराब व्हायला लागले की ते पडण्यास जास्त वेळ लागत नाही.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुतखडयासारखे  आजार देखील उद्भवू शकतात. कॅल्शियमच्या कमीमुळे तुम्हाला लवकरच थकवा येतो. थोडे काम करून किंवा चालून कंटाळा आला आणि विश्रांती घ्यावी असे  वाटते. यामुळे, आपण तणाव आणि नैराश्य येत.

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास कंबरदुखीची समस्या जास्त प्रमाणात होते. जर आपले नखे पुन्हा पुन्हा तुटत असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियमचा अभाव असल्याचे हे लक्षण आहे. नखे वाढण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. जेव्हा शरीरात त्याचे प्रमाण योग्य नसते तेव्हा नखे कमकुवत होऊ लागतात आणि तुटू लागतात.

शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, दही, बदाम, पनीर यांचा समावेश करू शकता. हे कॅल्शियमचे प्रमुख स्त्रोत आहेत. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण आपल्या मनानेच कोणत्या हि गोळ्या सप्लीमेंट्स किंवा औषधे घेऊ नका. त्या ऐवजी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांची मदत घेऊ शकता. अथवा आहारात वरती सांगितलेला बदल आपण करू शकता.

आपल्याला शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखावी ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *