- आरोग्य

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

हवेतील प्रदूषण आहातील बदल, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, क्षारयुक्त पाणी, ताणतणाव यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. बऱ्याचदा केस गळण्याची आणि न वाढण्यामागे हि कारणे असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत. केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

केसांना धूळ, उन आणि प्रदूषणापासून वाचविणे खूप गरजेचे असते. केस प्रदूषण, सूर्यप्रकाश किंवा धूळ यांच्या संपर्कात आल्यास कोरडे व निर्जीव होतात. म्हणूनच उन्हात बाहेर पडताना केसांना स्कार्फ बांधून बाहेर पडा.

केस जलदगतीने वाढवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पुरेसे पाणी पिणे. दररोज ४ ते ५ लिटर पाणी शरीराला आवश्यक आहे. पाणी आपल्या केसांना ओलावा प्रदान करते, केस जाड आणि मजबूत बनवते.

पाणी शरीरात उपस्थित हानिकारक घटक नष्ट करण्यात मदत करते आणि निरोगी शरीर तयार करते. केसांची वाढ होण्यास आणि केसांना चांगले ठेवण्यास मदत करते.

केस लांब वाढवण्यासाठी खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात.

लांब केस वाढवण्यासाठी केसांना कांद्याच्या रसाने मालिश करा. कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे.

थोड्याश्या मधाने केसांच्या मुळाशी मालिश करा. तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला उपाय आहे. मधाने केसांना पोषक तत्व मिळतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात. (मधाचा वापर करण्यापूर्वी थोड्याश्या भागावर करून बघा. काही वेळेस मध शुद्ध नसेल किंवा इतर काही कारणामुळे केसांना हानी पोहचू शकते.)

आपले केस गळू नयेत यासाठी आपण केस धुण्यासाठी रिठ्ठ्याचा आणि शिकेकाईचा वापर करू शकता. रिठा आणि शिकेकाई मधून आपल्या केसांना पोषण मिळून केस गळणे कमी होते.

केस लांब वाढवण्यासाठी केसांना दही लावा. दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.

केस लांब वाढवण्यासाठी केसांना कोरफडीचा गर केसांना चोळावा आणि एका तासानंतर केस कोमट पाण्याने धुवून काढावेत किंवा अंघोळ करावी. कोरफड गरामधील पोषक तत्वांमुळे केस जलद वाढतात. आणि केसांना चमक येते. केस मऊ होतील. कोरफड गराच्या वापराने केस गळती थांबली आहे हे तुम्हाला एक दोन दिवसात लगेचच जाणवेल.

 केस धुण्यापूर्वी तेलाने मालिश करणे आवश्यक आहे, परंतु आपण अगदी हलके हातांनी मालिश केली पाहिजे. केसांची मालिश करण्यासाठी आपण नारळाच्या तेलाचा तसेच बदाम तेलाचा वापर करू शकता.

बाजारातून खरेदी केलेले रासायनिक पदार्थ शैम्पू ,जेल टाळावेत. केसांचा आरोग्यासाठी संतुलित आहार घ्यावा त्याच बरोबर वेळेवर झोप आणि शारीरिक व्यायाम देखील करावा.

आपल्याला केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *