- आरोग्य

मान दुखीवर प्रभावी घरगुती उपाय

एका विशिष्ट स्थितीत मान बराच वेळपर्यंत राहिल्याने आपली मान दुखायला लागते. या गोष्टीमुळे दुखू लागते आपली मान जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणे, जास्त वेळ मोबाइल चा वापर करणे, जास्त वेळ लिहिणे, वाचणे यामुळे काही वेळेस मान फिरवणे देखील कठीण होउन जात म्हणुनच आज आपण जाणून घेणार आहात मान दुखीवर घरगुती उपाय

मान दुखत असल्यास थोडेसे बर्फाचे तुकडे घ्या ते प्लास्टिकची पिशवी असल्यास त्यामध्ये ठेवा. अन ज्या ठिकाणी दुखत आहे त्या भागावर हलक्या हाताने २ मिनिटे फिरवा. थोड्या थोड्या वेळाने अस करा. यामुळे मान दुखीच्या वेदना कमी होतील. बर्फाने शेकवल्याने रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि वेदना कमी होतात. तसेच सूज सुद्धा कमी होते.

मान दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे सैंधव मीठ टाकुन आंघोळ करा. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. सैंधव मिठाच्या पाण्याने आंघोळ करताना एक काळजी अवश्य घ्या ती म्हणजे त्या पाण्याने आपले केस धूऊ नका.  

कॅल्शियम हा आपल्या शरीरासाठी एक आवश्यक  घटक आहे, जो स्नायूंच्या आणि हाडांच्या मजबूती साठी  महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्या कमीमुळे सुद्दा मान दुखु शकते.

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करा. तसेच आहारात सुकामेवा म्हणजेच बदाम, काजू, अंजीर, खारीक यांचा समावेश करा. मान दुखीचा त्रास होऊ नये यासाठी आपण पुढील प्रकारे काळजी घेऊ शकता.

बसून काम करताना आपल्या मानेला ताण पडणार नाही अश्या पद्धतीने काम करा. जास्त वेळ एका जागी बसून काम करणार असाल तर मध्येमध्ये उठत जा. थोडेसे स्ट्रेचिंग करुन मग कामाला लागा. मानेचे थोडे व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या मानेचा ताण कमी होईल. मोबाइल फोनचा जास्त वापर टाळा.

आपल्याला केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *