- आरोग्य

घसा दुखणे, आवाज बसणे यावर सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

बदलत्या वातावरणामुळे घशात खवखव होणे आवाज बसणे. हि समस्या बऱ्याचदा होताना आपल्याला दिसून येते. घसा दुखत असल्यास कोणताही पदार्थ गिळताना घसा दुखतो किंवा जळजळ होते, घश्याच्या खवखवीमुळे स्वरयंत्राला सूजही येऊ शकते. म्हणूनच वेळीच त्यावर उपाय करणे गरजेचे असते.  म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. घसा दुखत असल्यास आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

घसा दुखत असल्यास 1 लिटर पाणी घ्या त्यामध्ये 4 मोठे चमचे मीठ टाका. हे पाणी चांगले उकळून घ्या. थोडे थंड झाल्यावर या कोमट पाण्याने गुळण्या करा. थोड्या थोड्या वेळाने असे करा. कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होतील. आणि आपला घसा मोकळा होईल.

घसा मोकळा होण्यासाठी दिवसभरात चार ते पाच वेळा आपल्याला मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजेत. जर मीठ टाकलेल्या पाण्याने गुळण्या करणे शक्य नसेल तर आपण  कोमट पाणी पिण्याची सवय लावा.

घशात खवखव होत असल्यास गुळवेलाचा काढा घ्या. त्यासाठी ग्लासभर पाणी घेऊन त्यात गुळवेलाच्या वेलीचे बोटभर लांबीचा तुकडा  ठेचून टाका. अन उकळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर प्या.

गुळवेलाचा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी असतो. गुळवेलामध्ये अनेक एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात.  जे आपली घसा दुखी अगदी कमी वेळात घालवतील.

घसा दुखत असल्यास ग्लासभर गरम दूधात एक चमचा हळद घालून ते रात्री झोपण्याआधी घ्या. हळदीमधील अँटी फंगल आणि  अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे घश्याची खवखव आणि दुखणं कमी होण्यास मदत मिळते.

घशात खवखव होत असल्यास यासाठी अडुळसा पानांचा काढा फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा घ्या. असे केल्याने घसा दुखीत आराम मिळेल.

घशात खवखव होत असल्यास आल, दालचिनी, आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी या चहाचे सेवन केलेत तर आपल्याला आराम मिळेल.

असा चहा प्यायल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही वाढेल. आणि घश्याची खवखव कमी होण्यास मदत मिळेल. घशात खवखव घालवण्यासाठी आपण जेष्ठ मधाच्या कांड्या चघळा. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

मधात असे गुणधर्म असतात जे घशातील  खवखव कमी करण्यास मदत करतात. घसा दुखत असल्यास आपण चमचाभर मध एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्याने आपल्याला लवकर आराम मिळू शकतो.

घसा खवखवत असल्यास गुळाचा छोटासा खडा खाल्ल्याने हि आराम मिळतो. घसा दुखत असल्यास आपण गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. गरम पाण्याची वाफ घेतल्याने घसा आणि नाक मोकळे होण्यास मदत मिळेल.

घशात खवखव होत असल्यास सकाळी 4 ते 5 मनुके चावून खा. त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. असे केल्याने घश्याचे दुखणे कमी होईल. घसा दुखत असल्यावर आपण पुढील प्रकारे काळजी घेतली पाहिजे

घसा दुखत असल्यावर आपण थंड पदार्थ खाऊ नका. त्याच बरोबर तेलकट पदार्थ हि खाऊ नका. घश्याला ताण देऊन बोलणे टाळा. घसा दुखत असल्यावर अन्न गिळताना आपल्याला त्रास होत असेल तर अशा वेळी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

आपल्याला घसा दुखणे, आवाज बसणे यावर सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *