- आरोग्य

भुवया (आयब्रो) दाट बनविण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

चेहरा आकर्षक बनविण्यासाठी आयब्रो मुख्य भूमिका निभावतात. चेहऱ्याच्या आकारानुसार भुवईचा आकार असतो. परंतु फारच कमी मुली आहेत ज्यांच्या भुवया नैसर्गिकरित्या काळ्या-दाट आहेत. प्रत्येक मुलीला दाट भुवया हव्या असतात. यासाठी बरेच प्रयत्न केले जातात परंतु काही घरगुती उपचार आहेत ज्याद्वारे तुमची भुवई दाट होऊ शकते. चला तर मग पाहूया आयब्रो दाट बनवण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत.

भुवया दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी नियमित बदामाच्या तेलाने भुवयांची मसाज केल्यास भुवयांचे केस दाट आणि काळे होतात. बदामाच्या तेलात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे आपले केस मजबूत होण्यास मदत मिळते.

भुवया दाट बनविण्यासाठी रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजवून सकाळी त्या मेथीदाण्याची पेस्ट करा. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट आपल्या भुवयांवर लावा. या पेस्टमुळे त्वचेचे पोषण होते. भुवयांचे केसही दाट होण्यास मदत होते.

भुवया दाट बनविण्यासाठी थोड्या नारळ तेलात लिंबाचे काही तुकडे घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करा. हे मिश्रण रात्रभर भिजवा. नंतर दुसऱ्या रात्रीपासून कापसाच्या मदतीने हे मिश्रण आपल्या भुवयावर लावा. रात्रीच्या वेळी हे दररोज करा. जोपर्यंत डोळ्याच्या भुवई दाट दिसत नाही.

भुवया दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी जास्वंदीच्या फुलाची पेस्ट हलक्या हाताने आपल्या भुवईवर लावा सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. हा उपाय साधारणपणे तीस दिवस केल्यावर आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात. जास्वंदीच्या फुलाची पेस्ट लावल्याने केसांची मूळ घट्ट होण्यास मदत होते.

भुवया दाट बनविण्यासाठी कोरफडची पाने सोलून घ्या आणि त्यातील गर काढा आणि भुवयावर लावा. असे केल्याने आयब्रो द्रुतगतीने दाट होण्यास मदत होते. तुम्ही बाजारामध्ये मिळत असलेले एलोवेरा जेल वापरू शकता.

भुवया दाट बनविण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करू शकता यासाठी कापसाच्या बोळ्याने कांद्याचा रस भुवयांवर लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

भुवया दाट बनविण्यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकता यासाठी एक चमचा एरंडेल तेल कापसावर घ्या. आणि ते आपल्या भूवायावर लावा. हलक्या हाताने दोन मिनिट चोळा.

10 ते 15 मिनिट राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. महिनाभर हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर आपल्याला एरंडेल तेलाची एलर्जी असेल तर हा उपाय करू नका.

दुधामध्ये व्हिटॅमिन आणि प्रथिने आढळतात. हे डोळ्याच्या भुवईसाठी फायदेशीर आहेत. भुवईवर दूध लावण्यापूर्वी ते कापसामध्ये भिजवा. हे डोळ्याच्या आयब्रोवरील केसांच्या मुळांना पोषण देईल आणि त्यांना वाढण्यास मदत करेल.

भुवया दाट बनविण्यासाठी आपण अंड्याच्या बलकाचा वापर करू शकता यासाठी एका अंड्याचा बलक वाटीत काढून घ्या त्यानंतर चमच्या साहय्याने तो चांगला फेटून घ्या. कापसाच्या बोळ्याने तो आपल्या भुवयांवर लावा.

साधारणपणे 15  मिनिटे तसेच ठेवून नंतर गार पाण्याने धुवून टाका. अंड्याचा बलक केसाच्या ग्रंथीचे पोषण करून भुवया वाढण्यासाठी मदत करतो. आठवड्यातून दोन वेळा आपण हा उपाय करु शकता.

आपल्याला भुवया (आयब्रो) दाट बनविण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *