- आरोग्य

नाकाजवळ, डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी घरगुती उपाय

मिलीया म्हणजे छोटे छोटे सफेद किंवा पिवळसर रंगाचे दाने मिलीया डोळ्याखाली, कपाळावर किंवा नाकाजवळ व डोळ्यांच्या आजुबाजुला गालावर येतात. चेहऱ्यावर मिलीयांची  संख्या वाढली तर ते आपले सौंदर्य खराब करतात.

सहसा त्यांची आग, वेदना होत नाही पण चेहऱ्यावर खरबुडेपणा माञ जाणवतो. म्हणुनच आज आपण चेहऱ्यावर येणाऱ्या मिलीया कशा घालवायच्या याची माहिती आज घेणार आहोत. चला तर जाणुन घेउयात.

चेहऱ्यावर येणाऱ्या मिलीया घालवण्यासाठी एक छोटा टॉवेल घ्या. टॉवेल सहन होइल इतक्या गरम पाण्यात भिजवा आणि त्या नंतर तो टॉवेल चेहऱ्यावर पूर्णपणे झाकून टाका. असे दररोज काही आठवड्यांसाठी करा. असे केल्याने, चेहऱ्याचे बंद छिद्र उघडतील आणि डेड सेल बाहेर येईल. शक्य झाल्यास 10-15 मिनिटांसाठी चेहऱ्याला स्टीम द्या.

डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी मूठभर मेथीची पाने एका वाटीत घेऊन थोडेसे पाणी मिसळून बारीक करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण आपल्या डोळ्यांच्या आजू बाजूला लावा. नंतर 15 मिनिटांनंतर चेहरा धुऊन टाका. असे केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होइल आणि मिलिया कमी होतील.

मिलीया घालवण्यासाठी चेहऱ्यावर शुद्ध मध लावा आणि ते 15 मिनिटे तसेच राहुद्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा, असे दररोज करा. असे केल्याने चेहऱ्यावर वर येणाऱ्या मिलीया घालवण्यासाठी मदत होइल.

डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी अर्धा चमचा एरंडेल तेल चेहऱ्यावर लावा. नियमित असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर मिलीया येणार नाहीत. एरंडेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध गुणधर्म असतात. जे मिलिआ होण्यापासून रोखतात.

मिलीया घालवण्यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. 15  मिनिटानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून 3 वेळा असे करा. असे केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होइल आणि मिलिया कमी होतील.

मिलीया घालवण्यासाठी डाळिंबाची साल भाजून घ्या आणि नंतर ते मिक्सर मध्ये बारीक करा. नंतर त्यात लिंबू किंवा गुलाबाचे पाणी मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा आणि 20 मिनिटाने चेहरा धुवा. डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे त्वचेसाठी चांगले असतात. डाळिंबाच्या सालीची पावडर वरती दिलेल्या पद्धतीने लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमही दूर होतील.

चेहऱ्यावरील मिलीया घालवण्यासाठी आपण व्हिनेगरचा हि उपयोग करू शकता. यासाठी एका कापसाचा बोळा पाण्यात बुडवून घ्या मग त्यावर एक चमचा व्हिनेगर घाला. हलक्या हाताने तो बोळा मिलीया प्रभावित भागावरून फिरवा.

दिवसातून दोन वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे. साधारणपणे पंधरा दिवसात आपल्या चेहऱ्यावरील मिलीया नाहीश्या होतील. हा उपाय शक्यतो लहान मुलांवर करू नका. कारण त्यांची त्वचा जास्त संवेदनशील असते.

डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी कोरफडाच्या गराने दिवसातून दोनदा चेहऱ्यावर मालिश करा. हवे असल्यास आपण त्यात ग्रीन टी मिसळा. नंतर 15 मिनिटांनी ते पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील मिलिया कमी होतील.

चेहऱ्यावरील मिलीया कमी करण्यासाठी आपण एक कच्चा बटाटा कापून त्याचे स्लाइस करा. ते चेहऱ्यावरील मिलीया प्रभावित भागावर हलक्या हाताने घासा. 10 मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. दहा ते पंधरा दिवसात आपल्या चेहऱ्यावरील मिलीया कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल.

नारळाच्या तेलात अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी आपल्या चेहर्यागवर रात्री झोपण्याच्याआधी हळूवारपणे लावा आणि मसाज करा.

सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. नारळ तेलामुळे कडक मिलिआ मऊ आणि गुळगुळीत होतील. जर आपल्या चेहऱ्यावर हि मिलीया असतील तर आपण आपल्या चेहऱ्याची पुढील प्रकारे काळजी घेतली पाहिजे.

आपण सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहऱ्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाऊ नका. कडक सूर्यप्रकाशामुळे आपला चेहरा आणखी खराब होऊ शकतो. तसेच चेहऱ्यावर मिलिया असल्यास आपण चेहऱ्यावर जास्त मेकअप हि करू नका.

मेकअप केल्याने चेहऱ्यावरील छिद्रे बंद होऊन चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मिलीया येऊ शकतात. मिलीया घालवण्यासाठी बऱ्याचदा आपण नखाने त्या भागावर खाजवतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर जखम होऊ शकते. म्हणूनच आपण मिलीयावर नखाचा वापर करू नका.

आपल्याला नाकाजवळ, डोळ्यांच्या आजुबाजुला येणारे छोटे सफेद रंगाचे दाणे घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *