- आरोग्य

डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

कंप्यूटर, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे, तणाव, झोपेची कमतरता अशा कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्याने  त्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. म्हणूनच आज आपण काही घरगुती उपायांची  माहिती घेणार आहोत ज्याच्या मदतीने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होऊ शकतात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक मध्यम आकाराचा बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर गाळणीने त्याचा रस एका वाटीत काढून घ्या. त्यानंतर कापसाच्या बोळ्यावर चमचाभर हा रस घ्या.

आणि हलक्या हाताने काळजीपूर्वक हा रस आपल्या डोळ्यांखालील काळ्या वर्तुळावर लावा. 20 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. साधारणपणे 15 दिवस हा उपाय केल्याने आपल्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ बनवून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर “हलक्या हातांनी” लावा. १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर दुधाच्या मदतीने ही पेस्ट काढा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल. बराच काळ व्यवस्थित  झोप न घेतल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतात. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेतली तरी ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे  कमी होतील.

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एक पूर्ण पिकलेल्या टोमॅटोच्या बिया काढून पेस्ट बनवा. हे आपल्या डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांवर लावा. अर्धा तास तसेच राहूद्या. नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने काही दिवसात काळी वर्तुळे कमी होतील.

 डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रात्री डोळ्याखाली थोडेसे बदाम तेल लावा आणि “हलक्या हातांनी” मालिश करा. सकाळी उठल्यानंतर आपले तोंड धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काही पुदीन्याची पाने वाटून घ्या. ही पेस्ट आपल्या डोळ्यांखाली लावा. पुदीन्याच्या पानामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटिमायक्रोबयल गुण असल्याने आपल्या डोळ्यांखालील काळेपणा त्वरीत दूर होण्यास मदत मिळते.

काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एक संत्र्याचा रस काढून एका वाटीत घ्या. नंतर या संत्र्याच्या रसामध्ये ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा आणि हे मिश्रण कापसाच्या बोळ्यावर घ्या. नंतर काळजीपूर्वक आपल्या डोळ्यांच्या खालील भागावर लावा.

लक्षात राहूद्या डोळ्याखाली संत्र्याचा रस लावला आहे त्यामुळे साधारणपणे 15 मिनिटे डोळे उघडू नका. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने केवळ काळी वर्तुळे दूर होणार नाहीत, तर डोळ्यांखाली असणाऱ्या त्वचेला नैसर्गिक चमकही येईल.

डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एक काकडी कापून 15 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर ते काकडीचे काप 10 मिनिटे डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांवर लावा. 15 मिनिटे  राहूद्या. नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने काही दिवसात काळी वर्तुळे कमी होतील. डोळ्याखालील काळी वर्तुळे येऊ द्यायची नसेल तर अशी काळजी घ्या:

डोळ्यांच्या भोवती जास्त मेकअप करु नका. झोपण्याआधी मेकअप काढून टाका आणि चेहरा व्यवस्थित धुउनच झोपा. डोळ्या भोवती मेकअप करताना शक्यतो डोळे बंद ठेवून मेकअप करा. म्हणजेच डोळ्यांच्या भोवती मेकअप करण्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत घेत चला. स्वत मेकअप करताना डोळे उघडे ठेवावे लागतात. यामुळे चुकून आपल्याकडून डोळ्यामध्ये मेकअपच्या गोष्टी जाऊ शकतात.

रोज कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या. गरजेपेक्षा जास्त झोपल्याने सुध्दा डोळ्याखालील काळी वर्तुळे येतात. प्रमाणापेक्षा जास्त आणि अगदी कमी उजेडात काम करू नका. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या. डोळ्यांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्या. डोळ्यावर ताण येईल अशा गोष्टी करू नका.

आपल्याला डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *