जर आपल्या लाकडी फर्निचरमध्ये लहान छिद्रे दिसली किंवा आपल्या फर्निचरच्या सभोवताल पावडरसारखे काहीतरी दिसले, तर समजून घ्या. आपल्या फर्निचरवर वाळवीने हल्ला केलेला आहे. वाळवीचा त्रास घराघरात बघायला मिळतो.
वाळवीचा घरात प्रवेश झाला तर घरातील लाकडी कपाट, खूर्च्या, टेबल या साऱ्या लाकडाच्या वस्तू अवघ्या काही दिवसात खराब होऊ शकतात. औषधे किंवा फवारण्या करून ही वाळवीचा प्रभाव कमी होत नाही. आज आपण घरातील वाळवी घालवण्यासाठी घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.
घरातील वाळवी लागलेली वस्तू उन्हात ठेवा. उन्हामुळे वाळवी नष्ट होण्यास मदत होते. वाळवी घालवण्यासाठी एका कपड्यावर थोडेसे व्हाईट व्हिनेगर घ्या अन त्या कपड्याने साऱ्या लाकडाच्या वस्तू पुसून घ्या असे केल्याने वाळवी निघून जाईल.
ज्या ठिकाणी वाळवी आहे तेथे लाल तिखट शिंपडा. असे केल्याने वाळवी निघून जाईल. बोरेक्स म्हणजेच सोडियम बोरेट फर्निचरला लावल्यास वाळवीचा नाश होण्यास मदत होते. मिठ हे वाळवी दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी, जेथे वाळवी आहे तेथे त्यावर मीठाचे पाणी शिंपडा. मिठाचा प्रसार होताच वाळवी संपतील.
लाकडाच्या वस्तूला वाळवी लागली असल्यास त्यावर साबणाचं पाणी शिंपडा असे केल्याने वाळवी निघून जाईल. लाकडाच्या वस्तूला वाळवी लागली असल्यास त्यावर कडुलिंबाची पावडर किंवा त्याचे तेल शिंपडल्याने वाळवी नष्ट होते.
वाळवी लागू नये यासाठी आपल्या घरातील फर्निचर खरेदी करताना वाळवी प्रतिबंधक लाकडाची निवड करा. ज्याला वाळवी लागत नाही. शिसवी, तसेच सागवान व मोहोगनी या जातीच्या लाकडांना वाळवी लागत नाही.
लाकडाच्या वस्तूला वाळवी लागू नये यासाठी आपण संत्र्याच्या सालीचे तेल आपल्या लाकडाच्या गोष्टीना वर्षातून दोन वेळा लावा. हे तेल छोट्या पाणी मारायच्या स्प्रे चा वापर करून आपल्या लाकडाच्या वस्तूवर शिंपडू शकता. संत्र्याच्या सालीचे तेल लावल्याने लाकडाच्या वस्तूला वाळवी लागत नाही. संत्र्याच्या सालीचे तेल आपल्याला मेडिकल मध्ये भेटू शकते.
आपल्याला वाळवी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.
जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.