- आरोग्य

ब्लीच केल्यानंतर चेहऱ्याची आग होणे, चेहरा लालसर होणे, चेहऱ्याला खाज येणे यावर घरगुती उपाय

चेहऱ्यावरील डाग, उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळसरपणा दूर करण्यासाठी बऱ्याचदा महिला चेहऱ्याला ब्लीच करतात. ब्लीचमध्ये असणाऱ्या रासायनिक घटकामुळे त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण कमी होते आणि चेहऱ्यावरील डाग आणि चेहऱ्यावर आलेला काळसरपणा कमी होतो.

परंतु जास्त वेळा ब्लीचिंग केल्याने चेहऱ्याला नुकसान हि होऊ शकते. ब्लीच केल्यानंतर चेहऱ्याची आग होणे, चेहरा लालसर होणे, चेहऱ्याला खाज येणे अशा गोष्टी होऊ शकतात आज इन्फोमराठीच्या या लेखामधून जाणून घेणार आहोत ब्लीच केल्यानंतर चेहऱ्याची आग होत असल्यावर आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

ब्लीच केल्याने चेहऱ्याची आग होत असल्यास, चेहरा लालसर झालेला असल्यास एका वाटीत गायीचे थंड दुध घ्या. त्यानंतर कापसाच्या बोळ्याने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर ते लावा. 30 मिनिटे चेहरा तसाच सुकू द्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. 

ब्लीच केल्यानंतर चेहऱ्याची आग होत असल्यास आपण कोरफडाच्या गराचा वापर करू शकता यासाठी सर्वप्रथम एका वाटीत कोरफडाचा गर काढून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने तो आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या. नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्याची आग होणे थांबून आपल्याला आराम मिळेल.

ब्लीच केल्याने चेहऱ्याला खाज येत असल्यास आपण एका वाटीत दोन चमचे चंदन पावडर घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाब जल मिसळून चांगली पेस्ट बनवा. त्यानंतर हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे राहूद्या नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. चंदन पावडर मध्ये असणाऱ्या शीतलक गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावर येणारी खाज थांबून होणारी आग थांबेल.

आपल्याला ब्लीच केल्यानंतर चेहऱ्याची आग होत असल्यावर आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकता ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *