- आरोग्य

तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

तोंडाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कीडल्याने, कांदा, लसूण, मसालेयुक्त पदार्थ सातत्याने व अति प्रमाणात खाल्याने, दात स्वच्छ न ठेवण्याने, अन्नाचे कण दात तसेच हिरड्यांमध्ये साचून राहिल्यामुळे किडलेल्या दातांमुळे, श्वसनमार्गातील काही संसर्गामुळे तोंडात किंवा श्वासात दुर्गंधी येते.

बऱ्याच वेळा बोलताना ती स्वतःलाच जाणवते व काही वेळा मुखदुर्गंधी दुसऱ्यांना हि जाणवते.  तोंडाला दुर्गंधी येत असल्यास लोक आपल्याशी बोलणे टाळू लागतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास हि कमी होतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

भरपूर पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते. पाण्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कणही निघून जातात. सकाळी उठल्याबरोबर विशेष करून जास्त पाणी प्या. शक्यतो चूळ भरूनच तोंड धुवा नाहीतर खाल्लेले अन्नकण दातांमध्ये अडकून मुखदुर्गंधी उत्पन्न करतात. तसेच कच्चा कांदा, लसूण यांच्या सेवनाने मुखदुर्गंधी अधिकच वाढते. म्हणून जेवल्यानंतर भरपूर पाण्याने चूळ भरून तोंड साफ करा.

तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी जेवण झाल्यानंतर दोन्ही वेळा चमचाभर बडीशेप चघळून खाल्ल्याने तोंडाचा वास काही दिवसात जातो आणि पचन क्रिया देखील सुधारते. बडीशेप खाल्याने जेवणाचे पचन व्यवस्थीत होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत मिळते.

तुळशीची चार पाणी रोज खाऊन वरून पाणी पिल्याने तोंडाला येणारा दुर्गंध जातो. तुळशीची पाने आरोग्याला हितकारक असतात. जर रोज तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.

एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्या पाण्याने रोज सकाळीच चूळ भरल्यास तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करून बघू शकता. जेवणानंतर एक लवंग चघळत खाल्याने तोंडाला वास येत नाही.

तोंडाला येणारी दुर्गंधी कोथिंबीरची 4-5 पाने किंवा धणे खाल्ल्याने देखील कमी होते. दह्याचे सेवन केल्यानेही तोंडाची दुर्गंधी दूर होते. पेरूची कोवळी पाने चावून खाल्ल्याने मुखदुर्गंधी दूर होते. तसेच रोज दोन पुदिन्याची पाने खाल्यानेही दुर्गंधी गायब होते.

हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *