- आरोग्य

तांदळामध्ये अळ्या, पाकोळ्या होऊ नये यासाठी घरगुती उपाय

आपल्या देशामध्ये भात खायला सगळ्यांनाच आवडत. त्यामुळे बऱ्याचदा वर्षभर पुरेल इतका तांदूळ एकदमच खरेदी केला जातो. इतका तांदूळ साठवताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. वातावरण बदलामुळे, दमट जागी तांदूळ साठवल्यामुळे तांदळामध्ये अळ्या, पाकोळ्या होऊ शकतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. तांदळामध्ये अळ्या, पाकोळ्या होऊ नये यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.

तांदळामध्ये अळ्या होऊ नये यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये तांदूळ ठेवणार आहात ते स्वच्छ आणि धुवा, नंतर शक्य असल्यास, काही तास सूर्यप्रकाशात ठेवा जेणेकरून त्यात ओलावा किंवा पाणी राहणार नाही. जर आपल्याला भांडे उन्हात ठेवणे शक्य नसेल तर सुती कपड्याने पुसून कोरडे करा. मग त्यामध्ये तांदूळ साठवा.

तांदळामध्ये अळ्या होऊ नये यासाठी आपण तांदूळ साठवताना तो हवाबंद कंटेनर मध्ये साठवा. हवाबंद कंटेनरमध्ये आपण तांदूळ बऱ्याच काळासाठी ठेवू शकता. हवाबंद कंटेनर मध्ये तांदूळ भरून ठेवताना त्यामध्ये कडूलिंबाची पाने मिसळा. कडूलिंबाची पाने ठेवल्याने आपले तांदूळ आरामात वर्षभर चांगले राहतील.

तांदळामध्ये अळ्या होऊ नये यासाठी आपण पातळ सुती कपडा घ्या त्याचे कापून लहान चौकोनी भाग करा. साधारणपणे हातरुमालाच्या आकाराचे आपल्याला साधारण पणे 20 किलो तांदूळ असेल तर 6 ते 8 तुकडे लागतील त्यानंतर त्या कापलेल्या तुकडयावर मुठभर खडे मीठ घ्या.

आणि पुरचुंडी बांधा. त्यानंतर तांदूळ साठवायचे कोरडे केलेल्या भांड्यात खाली दोन बाजूला ह्यातील दोन पुरचुंडया ठेवा. नंतर त्यामध्ये तांदूळ भरा. थोडे भरून झाले कि परत दोन पुरचुंडया ठेवा. अश्याच प्रकारे पूर्ण भांडे भरा. अशा प्रकारे आपण तांदूळ साठवले तर तांदळाला कीड, अळ्या, पाकोळ्या होणार नाहीत.

आपल्याला तांदळामध्ये अळ्या, पाकोळ्या होऊ नये यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *