- आरोग्य

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

त्वचा जर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेली तर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात, साधारण पणे पोट, कंबर, छाती, हात आणि मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स येत असतात. अचानक वजन वाढल्यास अथवा अचानक कमी झाल्यास, स्त्रियांना ग’रो’द’र पणात किंवा बाळ जन्मल्यानंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येत असतात. काही घरगुती उपायानी स्ट्रेच मार्क्स नक्कीच कमी होऊ शकतात. चला तर जाणुन घेउयात स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपल्या आहारामध्ये व्हीटामीन बी १२ असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आहारात दुधाचा समावेश आपण करू शकता. तसेच आहारामध्ये प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश देखील चांगल्या प्रमाणात केला पाहिजे. मोड आलेल्या हरभऱ्यामधून आपल्याला प्रथिने मिळू शकतात. आहारामध्ये असा बदल केल्याने शरीरावर आलेले व्रण हे काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी बटाटा उभा कापून त्याचे स्लाईस करा आणि स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या ठिकाणी घासा. सुकल्यावर कोमट पाण्याने धूऊन टाका. बटाटयाच्या आतील रसामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

स्ट्रेच मार्क्सवर कोरफडाचा रस लावल्याने सुद्धा स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल. दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्या. असे केले तर आपल्या पोटावरील व्रण कमी होण्यास मदत होईल.

बदाम तेलाने दररोज मालिश केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी त्यावर एरंडीच्या तेलाने मालिश करा. असे केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल.

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता. या साठी २ चमचे चंदन पावडर घ्या त्यामध्ये थोडेसे गुलाब जल आणि एक चमचा हळद पावडर मिसळून चांगली पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी व्रण आले आहेत त्या ठिकाणी लावा. आणि हलक्या हाताने चोळा. अर्धा तास राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. हा उपाय केल्याने काही दिवसातच आपल्याला फरक दिसेल.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी अंड्याच्या सफेद भागाचा जाडसर थर त्यावर लावा. त्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करू शकता. जेव्हा हे पूर्ण सुकेल तेव्हा थंड पाण्याने धूऊन टाका. अंड्याच्या सफेद भागामध्ये प्रोटीन आणि अमीनो असिड्स असतात. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी त्यावर नारळाच्या तेलाने मालिश करा. असे केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत मिळेल.

महत्वाची गोष्ट स्ट्रेच मार्क जितक्या लवकर येतात तितक्या लवकर ते जात नाहीत. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला बर्या च दिवसांसाठी हे उपाय करावे लागु शकतात.

आपल्याला स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *