- आरोग्य

टाच दुखत असेल तर करा हे घरगुती उपाय

वयाच्या तिशीनंतर सगळ्यात पहिले कोणती समस्या जाणवत असेल तर ती म्हणजे टाच दुखी. टाच दुखत असेल तर आपल्याला हालचाल करणे हि अशक्य होऊन जात. विशेषत हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हि समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते.

घरातील फरशी गार पडल्यामुळे हि टाच दुखी होत असते. जर आपले अचानक वजन वाढले तर आपल्या शरीराचा सगळा भार हा टाचांवर येत असतो त्यामुळे हि टाचा दुखू शकतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. टाच दुखीवर घरगुती उपाय.

जर आपले काम उभे राहून असेल तर आपण पायात मऊ चप्पल्स वापरल्या पाहिजेत जेणेकरून टाचेला आराम मिळेल. पायात जास्त उंच असणाऱ्या चप्पल्स वापरणे टाळले पाहिजे. टाचा दुखी कमी करण्यासाठी आपण आपल्या तळ पायाच्या खाली बॉल ठेवून अंदाजे दोन मिनटापर्यंत रोल करा. असे केल्याने टाचा दुखी कमी व्हायला मदत मिळते.

टाचा दुखी कमी करण्यासाठी आपण हा उपाय नक्की करून बघा. सर्वप्रथम आपले पाय समोर करून खाली बसा. ओढणी किंवा टॉवेल आपल्या पायाच्या खालच्या बाजूने लावा आणि त्याची दोन्ही टोके आपल्या हातात घ्या.

आता आपल्या पायावर थोडासा ताण येईल अशा प्रकारे ती ओढणी खेचा. दोन ते पाच मिनिटापर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या टाचा सुजल्या असतील तर आपण त्या बर्फाने शेकवू शकता. बर्फाने शेकवल्याने सूज कमी येईल. 

टाचा दुखी कमी करण्यासाठी आपण राईच्या किंवा तीळाच्या तेलाने आपल्या तळव्याची मालिश करू शकता. मालिश केल्याने टाचदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. गरोदर पणात वजन वाढल्याने टाचा दुखत असल्यास आपण हा उपाय करू शकता.

टाचा दुखी कमी करण्यासाठी बाजारातून कोकम तेल आणा. साधारण पणे अर्धी वाटी कोकम तेल कढईमध्ये घ्या. आणि गॅस वर ठेवा.  गॅस हा मंद आचेवर राहूद्या.

त्या नंतर तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये त्यामध्ये थोडीशी हळद टाका. हे मिश्रण घट्ट व्हायला लागले कि गॅसवरून उतरवा. ज्या ठिकाणी आपली टाच दुखत आहे त्या ठिकाणी हलक्या हाताने आपल्या टाचेवर लावा. साधारणत एक आठवडा हा उपाय आपल्याला करायचा आहे.

आपल्याला टाच दुखीवर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *