- आरोग्य

बाजरीची भाकरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे पीक व वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. आज हि ग्रामीण भागामध्ये बाजरीच्या भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्या जातात. बाजरी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत.

बाजरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने, फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसात आपण बाजरीची भाकर खाल्ली पाहिजे. बाजरीची भाकर खाण्याचे बरेच फायदे आहेत.चला तर जाणुन घेउयात. बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते.त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन केले पाहिजे.

बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे जो रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी उपयुक्त आहे. बाजरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतात, त्यामुळे बाजरीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर बाजरीची भाकर खाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. बाजरीची भाकर खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते. थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन अवश्य केले पाहिजे, बाजरीचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहायला मदत मिळते.

बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. बाजरीमध्ये कॅल्शियम हे पोषक तत्व असते. नियमित बाजरीचे सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच सांधे दुखीचा त्रास हि कमी व्हायला मदत मिळते.

बाजरीचे नियमीत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन केले पाहिजे. सध्याच्या जीवनात स्नॅक्स व फास्ट फूड पदार्थ जास्त खाण्यात येतात यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. लठ्ठपणा हे अनेक असे आजारांना आमंत्रित करतात. बाजरीचे नियमीत सेवन केल्याने लठ्ठपणा दूर होतो आणि चरबी ही कमी होते.

आपल्याला बाजरीच्या भाकरी सोबत काय खायला आवडत ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आपल्याला बाजरीची भाकरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *