चामखीळ ह्या आपल्यासाठी धोकादायक नसल्या तरी चामखीळीमुळे आपल्या शरीराचे सौंदर्य बिघडते. विशेषता हातावर, बोटावर, मानेवर, पोटावर, पाठीवर डोळ्यांच्या आजू बाजूला चामखीळ येत असतात. पूर्वी चामखीळ घालवण्यासाठी चामखीळीवर घोडयाचा केस बांधायचे.
असे केल्याने फार वेदनांना सामोरे जावे लागायचे. चामखीळ घालवण्यासाठी आजकाल लेझर ट्रिटमेंट केली जाते. चामखीळ असलेल्या जागेवर लेझर किरणांचा मारा करून चामखीळ घालवली जाते. हा उपाय खर्चिक असतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय
चामखीळ घालविण्यासाठी एक चमचा अपल सायडर व्हिनेगर कापसाच्या बोळ्यावर घ्या. आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी ते लावा. आणि सुकू द्या. (जर आपल्या डोळ्यांच्या बाजूला चामखीळ असेल तर आपण हा उपाय करू नका)
काही दिवस हा उपाय नियमित केल्याने चामखीळीचा रंग बदलू लागेल मग चामखीळ सुकून निघून जाईल. जर अपल सायडर व्हिनेगर लावल्यानंतर त्या जागी वेदना होत असेल तर सुकल्यानंतर त्यावर नारळाचे तेल किंवा कोरफडाचा गर लावा.
चामखीळ घालविण्यासाठी हा सोपा उपाय आपण करून बघू शकता. यासाठी चमचामध्ये लिंबाचा रस घ्या. तो कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो चामखीळ असलेल्या जागी बांधून ठेवा. (जर आपल्या डोळ्यांच्या बाजूला चामखीळ असेल तर आपण हा उपाय करू नका) तास भरानंतर कापसाचा बोळा काढून टाका. हा उपाय साधारणपणे 30 दिवस केल्याने चामखीळ लहान असेल तर निघून जाईल.
शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा हि वापर करू शकता यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडेसे एरंडीचे तेल मिसळून पेस्ट बनवा आता हि पेस्ट हलक्या हाताने चामखीळीवर लावा. आणि सुकू द्या. हा उपाय नियमित केल्याने सुद्धा चामखीळ निघून जाईल.
हातावर, पायावर किंवा पोटावर चामखीळ असल्यास ती घालविण्यासाठी आपण हा सोपा उपाय करू शकता यासाठी थोडासा खायचा चुना घ्या त्यामध्ये थोडेसे तूप मिसळा आणि चामखीळ असलेल्या जागी लावा. आणि सुकू द्या काही दिवस हा उपाय केल्याने चामखीळ निघून जाईल.
जर आपल्या शरीरावरील चामखीळीमधून रक्त किंवा पू येत असेल, चामखीळ हि अवघड जागी असेल, डोळे किंवा नाक अशा संवेदनशील जागी चामखीळ असेल तर अशा वेळी आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.
आपल्याला शरीरावरील चामखीळ घालविण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.