- आरोग्य

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

दात जर पिवळसर असतील तर त्यामुळे चेहऱ्याची शोभा कमी होते. बऱ्याचदा खाल्यानंतर पदार्थ दातात अडकतात ते वेळीच साफ केले नाहीत तर दात खराब होऊ शकतात. आपल्याला कॉफी प्यायची सवय असेल तर कॉफीमध्ये असलेले कॅफेनमुळे आपल्या दातांचा रंग पिवळट दिसू लागतो.

याच बरोबर आपण काही गु’ट’खा, तं’बा’खू सारखे व्यसन करत असाल तर सुद्धा आपल्या दातांचा रंग बदलतो. म्हणूनच आज आपण दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती या लेखामध्ये  घेणार आहोत.

दातांच्या आजुबाजूला जर पिवळा थर साचला असेल तर त्याला प्लाक असे म्हणतात. अननसामध्ये असलेले इन्झाईम्स दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत मिळते. यासाठी अननसाची फोड घेऊन ती दातांवर चोळा. यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी जेवण झाल्यानंतर पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने चुळा भराव्यात. त्यामुळे दात शुभ्र होण्यास मदत मिळेल. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी 1 चमचा  बेकिंग सोडयामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही  पेस्ट रोज 1 ते 2 मिनिटे दातावर चोळा. या पेस्टचा सतत वापर केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीज् कुस्करून घेऊन ती पेस्ट दातांना हलक्या हाताने चोळून लावावी. असे काही दिवस केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी एक ते अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा. एक ते दोन मिनिटे चांगले मिसळा. ही पेस्ट आपल्या टूथब्रशवर लावून अर्धा ते एक मिनिट आपल्या दातांवर चोळा. असे काही दिवस केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालींचा देखील उपयोग करु शकता. संत्र्यांच्या सालीमध्ये सायट्रीक अॅसिड असते. या साठी संत्र्याच्या साली सावलीत सुकवून घ्या. चांगली सुकल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

दिवसातून 2 वेळा दातावर चोळा. या पेस्टचा वापर केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी केळ्याची साल टाकून न देता, सालीच्या आतील भाग दातांवर चोळावा. त्याने दात पांढरे होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी कडूनिंबाची काही पाने सावलीत सुकवून घ्या. चांगली सुकल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. दिवसातून 2 वेळा दातावर चोळा. या पेस्टचा वापर केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळेल.

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आपण लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. लिंबाच्या सालीमध्ये सायट्रीक असिड असते. त्यामुळे लिंबाच्या सालीचा वापर करून आपण आपले दात परत पांढरे शुभ्र करू शकता.

यासाठी लिंबाची साल सुकवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पावडर तयार झाल्यावर त्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून त्याने दिवसातून दोन वेळा त्याने आपले दात साफ करा. ह्या पावडर ने दात घासल्याने दातांचा पिवळेपणा कमी होईल.

दिवसभरातही काही खाल्ल्या-प्यायल्यानंतर चुळ भरण्याची सवय करून घ्यावी. असे केल्याने दात शुभ्र होण्यास मदत मिळेल. काळे मनुके चघळले तर या मनुक्यांमधून बाहेर पडणारे असिडीक गुणधर्म दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात. सकाळी उठ्ल्यानंतर जसे आपण ब्रश करतो तसेच रात्री झोपण्याच्या अगोदरही ब्रश करण्याची सवय लावून घ्यावी.

आपल्याला दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *