- आरोग्य

काखेत, मांड्याना झालेल्या खाज, खरुज, गजकर्ण, नायटा अशा त्वचा रोगावर घरगुती उपाय

काखेत, मांड्याना जास्त घाम येतो. बऱ्याचदा कामावरून आल्यानंतर आपण अंघोळ न करता हात पाय धूत असतो. ह्या घामामुळे आपल्या काखेत, मांड्यांना खाज, खरुज, गजकर्ण, नायटा असे त्वचा रोग होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत काखेत, मांड्याना झालेल्या खाज, खरुज, गजकर्ण, नायटा अशा त्वचा रोगावर आपल्याला कोणकोणते घरगुती उपाय करु शकतो.

ज्यांना काखेत खाज येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आपण जे कपडे वापरता ते शक्यतो कॉटनचे कपडे वापरा आणि आपले शर्ट हे थोडे ढिले असुद्या. त्याचबरोबर कपडे धुताना अँटीसेप्टिक लिक्विड वापरा. वेळच्या वेळी कपडे धुवा.

कामावरून आल्या नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करण्यासाठी आपण जे साबण वापरता ते वेगळे ठेवा. तसेच टॉवेल हि वेगळा वापरा. कारण खाज येणे, नायटा येणे हे संसर्गजन्य आजार आहेत. आपल्यामुळे ते आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना होऊ शकतात. म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.

काखेत, मांड्याना खाज येत असल्यास रात्री झोपण्याआधी आपल्याला शरीरावर ज्या ठिकाणी खाज येत आहे तो भाग कोमट पाण्याने धुऊन कोरडा करा त्या नंतर त्यावर नारळाचे तेल लावा. आठवडाभर हा उपाय केल्याने खाज येणे बंद होईल.

काखेत, मांड्याना जर नायटा आलेला असेल तर आपण तो घालवण्यासाठी चमचाभर हळद पावडर मध्ये शुद्ध तूप मिसळून ते नायटयावर लावा. साधारणपणे 10 दिवस हा उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल.

आपण अंगाला लावण्याचा जो साबण वापरता तो निवडताना शक्यतो हर्बल साबण वापरा. ज्यामध्ये कमीत कमी केमिकलचा वापर केलेला आहे असे साबण निवडा. बऱ्याचदा अंघोळ करण्यासाठी आपण केमिकलयुक्त साबण वापरल्याने आपली त्वचा अत्यंत संवेदनशील होते आणि अंगाला खाज येते.

काखेत, मांड्याना झालेल्या खाज, खरुज, गजकर्ण, नायटा घालवण्यासाठी आपण हा सोपा उपाय करून बघू शकता. यासाठी तुरटीचा बारीक खडा घ्या. तुरटीमध्ये अँटीबॅक्टरियल तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यासोबत एक चमचा हळद घ्या.

हळद लावली तर जखम लवकर भरून येते. त्यानंतर एक चमचा खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेलामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत मिळते. ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर तुरटी बारीक करून एका वाटीमध्ये घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद टाका.

त्यानंतर एक चमचा खोबरेल तेल त्यामध्ये टाका त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी त्रास होत आहे. त्या ठिकाणी हे हलक्या हाताने लावा. रात्रभर राहूद्या सकाळी कोमट पाण्याने धुऊन आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा. आपल्याला असणारे खाज, खरुज, गजकर्ण, नायटा सारखे सगळे त्वचा रोग नाहीशे होतील.

लहान मुलांना जर मांड्याना किंवा अवघड जागी खाज येत असेल तर त्याचे मुख्य कारण हे लहान मुले बऱ्याचदा आपल्या निकरमध्ये लघवी करतात. लघवी केल्यानंतर लगेच निकर न बदल्याने, तसेच त्यांच्यासाठी आपण वापरत असलेल्या पावडरमुळे, तेलामुळे सुद्धा खाज येऊ शकते.

यासाठी आपण त्यांच्या वापरायच्या निकर वेळच्या वेळी बदला तसेच त्या धुताना इतर कपड्यांमध्ये न धुता वेगळया धुवा तसेच त्या धुताना चांगल्या प्रतीचे अँटीसेप्टिक लिक्विड वापरा. त्याच बरोबर कपडे हे निवडताना कॉटनचे निवडा.

आपल्याला काखेत, मांड्याना झालेल्या खाज, खरुज, गजकर्ण, नायटा अशा त्वचा रोगावर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *