- आरोग्य

सकाळी कपभर ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे

आजचे युग खर पहिले तर धावपळीचे युग आहे. आपल्याला कामाच्या व्यापामुळे आपल्या शरीराकडे आरोग्याकडे म्हणावे इतके लक्ष देता येत नाही. आज आपण आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या ओव्याच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत.

ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक आजार ही दूर होतात. ओव्यामध्ये लोह, आयोडीन,  कॅरोटीन, पोटॅशियम, कॅल्शियम असते. ओव्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट काही प्रमाणात असतात.

जर आपल्याला आपले वाढलेले पोट कमी करायचे असेल तर आपण सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी एक चमचा ओवा मंद आचेवर तो पर्यंत भाजून घ्या.

त्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये भाजलेला ओवा मिसळून चांगले ढवळून घ्या. पाण्याचा रंग बदलला कि हे पाणी गाळून घ्या. अशा प्रकारे ओव्याचे पाणी तयार करून आपण सकाळी रिकाम्या पोटी हे पिऊ शकता.

ओव्याच्या पाण्यामध्ये अँटी इंन्फामेट्री गुण असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने आपल्या पाचक प्रणाली सुधारेल आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवणार नाही.

रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने आपली चयापचय क्षमता वाढते, ज्यामुळे चरबी कमी होते. आपल्याला गॅसची समस्या असल्यास, ओव्याचे पाणी आपल्यासाठी रामबाण उपाय आहे. ओव्याचे पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होते.

सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत मिळते. स्त्रियांना मा’सि’क पा’ळीच्या दरम्यान ओटीपोटात वेदना होत असल्यास ओव्याचे पाणी प्यायल्याने हा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

मात्र लक्षात असू द्या कि ओवा हा उष्णधर्मी असल्याने कमी प्रमाणातच याचा वापर करा. दात दुखत असल्यास ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास वेदना कमी होण्यास मदत मिळते.

ओवा हा उष्ण गुणधर्म असणारा मसाल्याचा पदार्थ आहे त्यामुळे ओव्याचे पाणी हे जास्त दिवस पिऊ नका. आठ दिवस प्यायल्या नंतर आठ दिवसांचे अंतर सोडा जेणेकरून आपल्या शरीरात अतिरिक उष्णता होणार नाही.

आपल्याला सकाळी कपभर ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *