- आरोग्य

हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या केस गळतीवर घरगुती उपाय

आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स असतात. हॉर्मोन्स म्हणजे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये असणारी प्रभावशाली रसायने. जी अंतःस्रावी ग्रंथींमध्ये तयार होऊन रक्तात मिसळली जातात. रक्तामधून विविध अवयवांपर्यंत पोहोचवून त्या अवयवांचे काम नियंत्रित करण्याचे कार्य करतात.

आपल्या निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी हार्मोन्स महत्वाची भूमिका बजावत असतात. मानसीक तणाव, पोषक आहाराचा अभाव, वेळेवर जेवण न करणे, शारीरिक कसरत व्यायामाचा अभाव यामुळे बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये हार्मोनल असंतुलन होते.

हार्मोनल असंतुलन झाल्याने महिलांना बऱ्याच गोष्टीना सामोरे जावे लागते. मासिक पाळी अनियमित होते, अचानक वजन वाढत अथवा कमी होत, रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.

केस प्रमाणापेक्षा जास्त गळू लागतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या केस गळत असतील तर आपण त्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.

केस गळणे थांबवण्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली थोड्याफार प्रमाणात बदलावी लागेल या साठी प्रथम आपण आपली मानसीक तयारी करून घ्या. हार्मोनल असंतुलन नियंत्रणात आणल्याने आपले केस गळणे आपोआपच कमी होईल म्हणून आपण पहिले त्याविषयी जाणून घेऊयात.

हार्मोनल असंतुलन नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील, हंगामी फळे, त्यानंतर मोड आलेले कडधान्य, दुध अशा गोष्टींचा आपल्याला आहारात समावेश करावा लागेल.

बाहेरचे पदार्थ, तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ, पॅकिंग केलेले पदार्थ खाणे थांबवाव लागेल. त्यानंतर सकाळी नाश्ता दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यामध्ये साधारणपणे 4 तासांचा अंतर ठेवायचा आहे, आणि जेवणाच्या वेळा पाळायच्या आहे.

मानसीक तणाव कमी करण्यासाठी आपण सकाळी बाहेर फिरायला जाऊ शकता, योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करू शकता. अर्धा तास शारीरिक कसरतीचा व्यायाम करा. दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्या. दिवसभरात जितके जमेल तितके खुश आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

रात्री जागरण करू नका. रात्रीची झोप हि आपल्या शरीराला चार्ज ठेवण्यासाठी गरजेची असते. सहा ते आठ तासांपर्यंत आपण झोप घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित केल्याने हार्मोनल असंतुलन नियंत्रणात यायला मदत होईल.

आपले केस गळणे थांबवण्यासाठी काही उपाय जाणून घेऊयात आपण जो शाम्पू निवडता तो निवडताना दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. शाम्पू हा नैसर्गिक घटक युक्त असायला हवा.

आपल्या डोक्याची त्वचा जर कोरडी असेल तर आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शाम्पू करा. कारण कोरड्या त्वचेमुळे केस जास्त प्रमाणात गळतात. केस गळणे थांबवण्यासाठी केस धुण्याआधी केसांची नारळाच्या अथवा बदामाच्या तेलाने मालिश करा.

केस गळणे कमी करण्यासाठी आपण केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण करू शकता. केस गळणे कमी करण्यासाठी केसांवर केमिकल युक्त प्रोडक्ट वापरणे टाळा, सारखे सारखे हेयर स्ट्रेटनींग करू नका. हेयर स्ट्रेटनींग करताना केस गरम केले जातात. त्यामुळे केसांवरील नैसर्गिक चमक निघून जाते.

केसांना पोषण मिळण्यासाठी आपण अंड्याच्या बलकाचा वापर करू शकता. आठवड्यातून एकदा अथवा दोनदा अंड्यातील पांढऱ्या बलक आपल्या केसांच्या मुळांवर लावा. अर्धा तास राहू द्या नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.

केस गळणे कमी करण्यासाठी आपण कांद्याच्या रसाचा हि वापर करू शकता. केसांच्या मुळाशी आपण कांद्याचा रस लावून ठेवा. अर्ध्यातासाने केस कोमट पाण्याने धुऊन टाका. केस गळणे कमी होईल.

आपल्याला हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या केस गळतीवर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *