- आरोग्य

थोडेसे आले आणि गूळ सोबत खाल्याने मिळणारे आरोग्यादायी फायदे

आले मसाल्याच्या पदार्थांमधील हा एक महत्वाचा पदार्थ मानला जातो कारण यात अनेक औषधी गुणधर्म असतात. आपल्या पैकी बऱ्याच जणांना आल्याचा चहा आवडत असेल. आले घालून चहा प्यायल्याने चहाचा स्वाद वाढतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि उष्णता टिकून रहावी यासाठी छोटासा आल्याचा तुकडा लहानश्या गुळाच्या खड्यासोबत खाऊ शकता.

सर्दी, खोकला या आजारात आले फार उपयुक्त आहे. आल्याचा काढा प्यायल्यास सर्दी, खोकल्यापासून सुटका होईल. या आजारात आले रामबाण उपाय आहे. त्यामुळे जर थंडीच्या दिवसात तुम्ही आल्याचा वापर तुमच्या रोजच्या आहारात ठेवलात तर असे आजार उदभवणार नाहीत.

ताप आल्यावर तोंडाची चव जाते. अशावेळी आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चघळल्यास तोंडाला चव येईल. कोरडा खोकला येत असल्यास आल्याच्या रसामध्ये चमचाभर मध घालून हे मिश्रण दिवसातून तीन चार वेळा घ्या. असे केल्याने कोरडा खोकला कमी येण्यास मदत मिळते.

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आल्याचा लहानसा तुकडा थोड्याश्या गुळासोबत खाल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते.

ज्यांची भूक कमी झाली  आहे त्यांच्यासाठी आले खाणे महत्वाचे आहे. कारण आले खाल्याने अथवा आल्याचा ज्यूस प्यायल्याने भूक वाढते. तसेच पचनक्रिया चांगली राहते. आले वेदनाशामक असते. डोके दुखत असेल तर आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावा असे केल्याने डोकेदुखी अगदी कमी वेळात थांबते.

आले आणि गुळ खाणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे परंतु आले आणि गुळ हे दोन्ही उष्ण गुणधर्म असणारे आहे. त्यामुळे त्यांचे सेवन हे ठराविक कालावधी साठीच करणे आपल्यासाठी हितकारक आहे. साधारण पणे 3 ग्राम आल्याचा तुकडा तितक्याच गुळासोबत आपण दहा दिवस खा. त्यानंतर आठ दिवसांचे अंतर सोडून परत खा. असे केल्याने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढणार नाही.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *