- आरोग्य

मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी करा हे घरगुती उपाय

मासिकपाळी येणे हि सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र या विषयी सार्वजनिक रुपात चर्चा केली जात नाही. त्यामुळे मासिकपाळी विषयी अनेक गैरसमज स्त्रियांच्या मनात असतात. बऱ्याच स्त्रियांना मासिकपाळी आली कि नकोसे वाटते, मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदना आणि चिडचिड त्या दिवसांमध्ये चेहरा निस्तेज होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

मासिकपाळी दरम्यान आलेले पिंपल्स हे नेहमीच्या पिंपल्सपेक्षा वेगेळे असतात. कारण ते आपल्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आलेले असतात. आज आपण जाणून घेऊयात मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपण आपल्या आहारात कोणकोणता बदल करून हि समस्या कमी करू शकतो.

आपण त्या दिवसांमध्ये काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पचनक्रियेमध्ये बिघाड होतो. म्हणून आपण शक्यतो त्या दिवसांमध्ये पचायला हलके असणारे पदार्थ जसे कि तांदळाची पेज, भाज्यांचे सूप, फळांचा रस (यामध्ये आंबट फळ टाळा ) या बरोबरच आपला नेहमीचा आहार भाजी पोळी, वरण भात असे पदार्थ खा.

पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळा. शक्यतो बाहेरचे तेलकट मसालेदार पदार्थ त्या दिवसांमध्ये खाऊ नका. आहारामध्ये सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या आपण खाऊ शकता.

यामुळे हार्मोन्सचे संतुलन राहण्यास मदत मिळते. हलका आहार आणि पुरेसे पाणी प्यायलाने आपली पचनक्रिया व्यवस्थित राहील. आणि आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येणे आपण टाळू शकाल.

त्या दिवसांमध्ये अति तिखट, मसालेदार आणि पचायला जड अन्न सेवन केल्याने पचनक्रियेमध्ये बिघाड होऊन आपल्या चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त पिंपल्स येऊ शकतात. या दिवसात मांसाहार करणे टाळा. त्या दिवसांमध्ये चीडचीड वाढत असते त्यामुळे आपण सकाळी योगा, प्राणायाम या गोष्टी करून मन शांत ठेवू शकता.

मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यासाठी आपण तुळशीच्या पानांचा रस एक चमचा आणि एक चमचा मध कपभर कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता. यामुळे होणारा त्रास कमी होईल. त्याच बरोबर आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. त्या दिवसांमध्ये मिठाचे सेवन हि कमी करा. घट्ट कपडे घालू नका. आपण हलकी काम करू शकता.

आपल्याला मासिकपाळी दरम्यान चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये यासाठी आपण आपल्या आहारात कोणकोणता बदल करू शकतो ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.  जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *