- Uncategorized

मधुमेह आजार असल्यास कोण कोणती फळे खावू शकता?

शरीरामधील रक्तातील साखरेच प्रमाण असंतुलित होत असेल अथवा वाढले असेल तर यालाच मधुमेह होणे असे म्हणतात.  आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे शरीराला लागणाऱ्या ऊर्जेसाठी ग्लुकोजमध्ये रुपांतर केल जात.

ज्यांना मधुमेह आजार झाला आहे त्यांच्यामध्ये इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते किंवा थांबलेली असते. शरीराला हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.

म्हणूनच मधुमेह आजार वाढून द्यायचा नसेल तर आहाराबाबत बरीच पथ्ये पाळावी लागतात. भूक भागवण्यासाठी आणि रोजच्या पोषक तत्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फळ खाणे सोपा मार्ग आहे. परंतु बहुतेक फळांमध्ये साखरेचे प्रमाण असते.

त्यामुळे मधुमेह हा आजार ज्यांना आहे त्यांच्या मनात हा संभ्रम असतो कि कोणते फळ खाल्याने आपली रोजची पोषक तत्वांची गरज हि पूर्ण होईल आणि शरीरातील साखरेचे प्रमाण हि वाढणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत. मधुमेह आजार असल्यास कोण कोणती फळे खाल्ली तर चालू शकतात.

मधुमेह आजार असल्यास आपण किवी हे फळ खाऊ शकता. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडेंट्स, फायबर अशी पोषक तत्वे असतात. किवीच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते, तसेच किवी या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो ज्यामुळे आपण किवीचा समावेश आपल्या आहारात करू शकता.

मधुमेह आजार असल्यास आपण जांभूळ या फळाचे सेवन करू शकता. जांभूळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला मदत मिळते. तसेच जांभळाच्या बीया सुकवून त्याची पावडर नियमित एक चमचा खाल्याने हि रक्तात्तील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत मिळते.

मधुमेह आजार असल्यास आपण पेरू या फळाचे सेवन करू शकता, पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते तसेच फायबर हि असतात त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास पेरूचे सेवन आपण करू शकता. पेरूचा ग्लुकोज निर्देशांक ही कमी असतो.

मधुमेह आजार असल्यास आपण फणस या फळाचे हि सेवन करू शकता. फानासामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन,थायमिन, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असतात.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी हे एक चांगले फळ आहे कारण ते इन्सुलिन प्रतिकार सुधारते. आपल्याला हि माहिती आवडली तर कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्ही याचा दुसरा भाग आपल्यासाठी लवकरच आणू.

आपल्याला मधुमेह आजार असल्यास कोण कोणती फळे खावू शकता ? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *