- आरोग्य

एल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम

अन्नाची चव हि ज्या भांड्यात आपण अन्न शिजवतो त्यावर अवलंबून असते. प्रत्येक भांड्यामध्ये तयार केलेल्या अन्नाची स्वतःची वेगळी चव असते. मातीच्या भांड्यात शिजवण्यात आलेल्या अन्नाची चव वेगळी असते, तर लोखंडी भांड्यात शिजवण्यात आलेल्या अन्नाची चव वेगळी असते. आपल्या घरातील स्वंयपाकाची बहुतेक भांडी एल्युमिनियमची बनलेली असतात.

जगातील सुमारे 60 टक्के भांडी एल्युमिनियमपासून बनविली जातात. याचे सर्वात मोठे कारण एल्युमिनियम हा धातू इतर धातूंपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ आणि उष्णतेचे चांगला वाहक असल्याने स्वंयपाकघरात एल्युमिनियमच्या भांड्याचा वापर सर्रास केला जातो. आज आपण एल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

एल्युमिनियमची भांडी स्वस्त असतात. परंतु आपल्या आरोग्यावर त्याचे बरेच दुष्परिणाम होत असतात. एल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या अन्नाचे सेवन केल्यास आपल्या शरीरात दररोज साधारणपणे 1 ते 4 मिलीग्राम एल्युमिनियम जात असत. आपले शरीर इतके एल्युमिनियम बाहेर काढू शकत नाही. कालांतराने या एल्युमिनियममुळे आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जाव लागू शकत.

जर आपण बारकाईने बघितले तर आपल्या लक्षात येईल. एल्युमिनियमच्या भांड्यात बनवलेल्या अन्नाचा रंग काही प्रमाणात बदलतो. एल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेल्या खाद्यपदार्थांची चव वेगळी असण्याचे कारण हि खूप रंजक आहे.

वेगवेगळ्या भाज्यांमधून आपल्याला वेगवेगळी जीवनसत्व आणि खनिजे मिळत असतात. परंतु एल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे एल्युमिनियम अन्नामधील लोह आणि कॅल्शियम सहजतेने शोषून घेते, ज्यामुळे आपली हाडे कमजोर होऊ लागतात. एल्युमिनियम भांड्यांमध्ये तयार केलेले अन्न खाण्याचा दुष्पपरिणाम लहान मुलांमध्ये लवकर दिसून येतो.

 जर आपण एल्युमिनियमच्या भांड्यात भाजी बनवली तर भाज्यांमध्ये असणाऱ्या घटकांशी एल्युमिनियमची रासायनिक प्रक्रिया होऊन भाजीची चव बिघडते त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. अशी भाजी खाल्याने बऱ्याचदा पोट दुखते. जुलाब सुरु होतात.

बरीच वर्ष एल्युमिनियमच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्यास एल्युमिनियम आपल्या स्नायू, मूत्रपिंड, यकृत आणि हाडांमध्ये जमा होते ज्यामुळे बरेच गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, अन्न नेहमी लोखंडाच्या, स्टेनलेस स्टील किंवा मातीच्या भांड्यात शिजवले पाहिजे. आपल्या अन्नाची चव आणि आरोग्यासाठी हे चांगले आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *