- आरोग्य

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

हिमोग्लोबीन हा शरीरातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन, शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटिन करतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. आज जाणून घेऊयात शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

सफरचंद रक्तपेशींच्या निर्मितीसाठी गुणकारी आहे. सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते जे पाचनक्रियेस महत्वाचे असतात. सफरचंद खाल्याने पचनक्रिया मजबूत होते. सफरचंद हाडांनाही मजबूत बनवण्याचे काम करते. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमी असल्यास आपण सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमी दूर करू शकता.

डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम आणि लोहाचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्यास आणि रक्तपेशींच्या निर्मितीसाठी डाळींब प्रचंड गुणकारी आहे. डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्या आहारात खजूराचा समावेश करा. खजूराध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

पालक या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्या आहारात पालकच्या भाजीचा समावेश करू शकता. या बरोबरच इतरही बऱ्याचश्या पालेभाज्यामध्ये लोह असते जसे कि मेथी, कोथिंबीर, पुदीना याभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन बरोबरच अनेक पोषक तत्व असतात. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

बीट हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे.बीटामध्येदेखील लोह आणि फॉलिक असिडचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील रक्तचं प्रमाण वाढविण्यास मदत होतेच सोबत हिमोग्लोबिन देखील वाढते.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे मिळतील. मधामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळते.

कलिंगडाच्या ज्युसमध्ये अटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं.

दररोज नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. त्यामुळे शरीरात स्वत:हून हिमोग्लोबीन तयार होते. ज्या लोकांना रक्ताची कमतरता भासते त्यांना बऱ्यापैकी व्यायाम ही केला पाहिजे.

आपल्याला शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *