- आरोग्य

थायरॉईड विकार कमी करण्यासाठी घरगुती उपाय

जगभरात मोठ्या प्रमाणावर थायरॉईड विकार पसरत आहे. थायरॉईड विकार हे मुख्यत स्त्रियांना होतात.थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी आहे. जी आपल्या मानेच्या आत आणि कॉलरबोनच्या अगदी वर असते.

थायरॉईड हा अंतःस्रावी ग्रंथीचा एक प्रकार आहे, ज्यामुळे हार्मोन्स तयार होतात. आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी या हार्मोन्सचा वापर केला जातो. ज्यांना थायरॉईड विकार आहे.

त्यांच्या शरीरामध्ये एकतर हार्मोन्स अत्यंत कमी प्रमाणात तयार होतात याला हायपोथायरॉईडीझम असे म्हणतात. किंवा हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. याला हाइपरथायरॉइडज्म असे म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहोत. थायरॉईड विकार कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ज्येष्ठमध थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारायला मदत करते. जेष्ठमधात ट्रीटरपेनोइड ग्लाइसेरीथेनिक एसिड हा प्रमुख घटक असतो ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आणि थायरॉईड विकार नियंत्रणात यायला मदत मिळते. आपल्याला थायरॉईड विकार असल्यास आपण ज्येष्ठमधाचे चूर्ण एक चमचा सकाळी आणि एक चमचा रात्री कपभर पाण्यासोबत घेऊ शकता.

हायपोथायरॉईडिझमचा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्न पचायला मदत करणाऱ्या गोष्टींचा आपण आपल्या आहारात समावेश करु शकता.जसे कि ताक, दही, योगर्ट यामुळे अन्न पचायला मदत मिळते.

थायरॉईड विकार नियंत्रणात आणण्यासाठी 2 चमचे धने रात्री भिजायला घाला. सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाण्यात ते मिसळा आणि 5 मिनिटे उकळून घ्या नंतर गार होऊ द्या कोमट असतानाच हे पाणी प्या. नंतर अर्ध्या तासाने नाश्ता करा. हा उपाय केल्याने थायरॉईड विकार नियंत्रणात यायला मदत मिळेल.

थायरॉईड विकार नियंत्रणात आणण्यासाठी आपण आल्याचा वापर करू शकता. आल्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात ज्यामुळे थायरॉईड विकार आटोक्यात आणण्यास मदत मिळते. आल्यामध्ये असणाऱ्या अॅंटी इंफलेमेटरी गुणधर्मामुळे थायरॉईडची समस्या कमी होते.

थायरॉईड विकार नियंत्रणात आणण्यासाठी अश्वगंधाच्या मुळ्यांचे चूर्ण आपण घेऊ शकता. अश्वगंधा हि आयुर्वेदिक वनस्पती असून तिचा वापर हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांसाठी केला जातो.

अश्वगंधाच्या मुळ्यांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्साईडसमुळे शरीराला गरजेच्या असणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती व्हायला मदत मिळते.  आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातून दोन वेळा अश्वगंधाच्या मुळ्यांचे चूर्ण एक चमचा कपभर पाण्यासोबत घेऊ शकता.

थायरॉईड विकार नियंत्रणात राहण्यासाठी आपण ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले पाहिजे. ज्वारीमधील पोषक घटक थायरॉईड विकार आटोक्यात आणण्यास मदत करतात.

आपल्याला थायरॉईड विकार कमी करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *