- आरोग्य

पायांना मुंग्या येत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

पाय एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी हि आपण याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आज आपण काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत ज्याचा अवलंब करुन आपण पायाला मुंग्या येण्याच्या समस्येवर सहज मात करू शकता.

पायाला मुंग्या आल्यास एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट आपल्या मुंग्या आलेल्या पायाला लावा. आणि हलक्या हाताने चोळा. आपल्याला लगेच आराम मिळेल. आपल्या पायाला सतत मुंग्या येत असल्यास रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून प्या. 15 दिवसात आपल्याला फरक जाणवेल.

पायाला मुंग्या आल्यास एका भांड्यात सहन होईल इतके गरम पाणी घ्या. त्यामध्ये मुठभर जाडे मीठ टाका. नंतर त्या पाण्यात 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवा. असे केल्याने पायाच्या नसा उत्तेजित होतात आणि त्यांचे कार्य सुधारते. यामुळे रक्त परिसंचरण वाढते.

पायाला सतत मुंग्या येत असल्यास अर्धा चमचा दालचिनी पावडर ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते. हा उपाय साधारणपणे आठ दिवस करा. पायांना मुंग्या येत असल्यास पायांची नियमितपणे कोमट केलेल्या मोहरीच्या तेलाने मालिश करा. मालिश केल्याने रक्त चांगल्याप्रकारे परीसंचन होते. 

आपल्या हाता पायाला कायम मुंग्या येत असल्यास आपण आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. त्याच बरोबर आपण सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या आठ ते दहा दिवस खा. लसणाच्या पाकळ्यामुळे तोंडाला दुर्गंध येऊ शकतो त्यामुळे लसून खाल्यावर दात घासा.

आपल्याला पायांना मुंग्या येत असल्यास आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकता याविषयीची ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *