- आरोग्य

डाळींब खाण्याचे १० फायदे

महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे पिक घेतलं जात. त्यामुळेच महाराष्ट्रात डाळींब हे फळ मुबलक प्रमाणात सहजपणे उपलब्ध होत.

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त फळ आहे. डाळींब हे अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के चे उत्कृष्ट स्त्रोत असते. डाळींबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत. डाळींब खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

नियमितपणे डाळिंब खाल्याने आपण हृदयाशी संबंधित आजार टाळू शकता. डाळींब खाल्याने आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण क्रियेला चालना मिळते. अपचन, आम्लपित्त, ताप या कारणामुळे जर आपल्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्याने आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी निघून जायला मदत मिळते.

डाळिंबाचे सेवन केल्याने आपले दात आणि हिरड्या मजबूत होतात. त्याच बरोबर डाळिंब खाल्याने दातांच्या किडीला सुद्धा प्रतिबंध केला जातो. नियमितपणे डाळिंब खाल्याने चेहऱ्यावर चमक येते. तसेच त्यामध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावरील मुरूम हि कमी होतात.

नियमित डाळिंब खाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण घटते. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी डाळिंबाची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये दोन चमचे मध मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. आठ दिवस हा उपाय करून बघा. आपल्याला नक्की फरक दिसेल.

डाळिंब खाल्याने शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी व्हायला मदत मिळते. जुलाब होत असतील तर डाळिंब खाल्याने ते लगेच थांबतात. डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असते, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खाल्ले पाहिजे. खोकला येत असल्यास डाळिंबाची साल बारीक करून कपभर कोमट पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने खोकल्याची उबळ येणे बंद होते.

आपल्याला डाळींब खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *