- आरोग्य

रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपण बऱ्याचदा बघितले असेल पैलवान लोक, व्यायाम करणारी लोक सकाळी भिजवलेले चणे खात असतात. तुमच्या हि मनात हा प्रश्न आला असेल कि भिजवलेले चणे खाल्याने नेमका काय फायदा होतो?

चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम,व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन ई असे पोषक घटक असतात. जे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. निरोगी राहण्यासाठी पोषणयुक्त आहार घेणे आवश्यक असते. आज आपण जाणून घेणार आहोत. भिजवलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी १ वाटी भिजवलेले चणे खाल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहायला मदत मिळते. भिजवलेल्या चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत व्हायला मदत मिळते.

भिजवलेले चणे खाल्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते ज्यामुळे डोळ्यांची पाहण्याची क्षमता चांगली राहते. सकाळी भिजवलेले चणे खाल्याने आपल्याला कधी हि हिमग्लोबीन कमी होणार नाही. चण्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते.

चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. वाढत्या वयाच्या मुलांना वाटीभर चणे खायला दिल्याने त्यांची शारीरिक वाढ चांगली होते. सकाळी भिजवलेले चणे खाल्याने आपले केस निरोगी आणि दाट राहण्यास मदत मिळते.

भिजवलेले चणे खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्समुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या निरोगी राहण्यास मिळते. परिणामी आपले हृदय निरोगी राहते.

भिजवलेल्या चण्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. भिजवलेले चणे हे व्यवस्थित चावून खाल्ले पाहिजे. आणि एक मुठभर किंवा वाटीभर इतक्याच प्रमाणात खा.

आपल्याला १ वाटी भिजवलेले चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *