- आरोग्य

वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी सोप्या टिप्स

बऱ्याचदा आपली स्मरणशक्ती कमजोर झाली आहे याची आपल्याला जाणीवच नसते. बऱ्याचवेळा आपण फोनवर बोलत असताना काय बोलायचं होत हे नेमक ते विसरून जातो, काही लोकांची नाव विसरतो, रोजच्या कामातील वस्तू विसरून जातो, एखादी वस्तू विसरून घरी जातो. या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत हि होत असतील तर ह्या सगळया गोष्टी कमजोर स्मरणशक्तीमुळे होत असतात.

आज आपण जाणून घेणार आहोत. स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आपण सकाळी प्राणायाम करू शकता. प्राणायाम केल्याने आपल्याला चांगला फायदा होईल.

शक्य तितक्या जुन्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करा. हा मेंदूचा व्यायाम आपली स्मरणशक्ती चांगली करण्यासाठी उपयोगी आहे. गोष्टी लक्षात आपण नियमितपणे या गोष्टी केल्या पाहिजे.

मानसीक तणाव असल्यामुळे सुद्धा आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो. मानसीक तणाव कमी करण्यासाठी आपण सकाळी मित्रांसोबत चालायला जा. मित्रांसोबत गप्पा मारा. आपल्या तणावाचे कारण बऱ्याचदा अत्यंत छोटे असते. अशा वेळी आपण आपल्याला घरातील सदस्यांसोबत, नातेवाईकांसोबत गोष्टी बोलून मन हलके करू शकता. डोक्यात इतर विचार असतील तर अशा वेळी आपण गोष्टी विसरतो.

चांगली झोप घेतल्याने आपला मेंदू चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणूनच आपण सहा ते आठ तास झोप घेतली पाहिजे. त्याचबरोबर पोषक आहार आणि पुरेसे पाणी हि प्यायले पाहिजे. व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलचा अतिवापर केल्याने हि आपली स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. म्हणून मोबाईलचा अति वापर करणे हि टाळले पाहिजे.

आपल्याला वाढत्या वयात स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी सोप्या टिप्स ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *