- आरोग्य

सकाळी रिकाम्या पोटी १ इलायची खाल्याने मुळापासून नाहीशे होतील हे ५ आजार

पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इलायची बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. इलायचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. इलायचीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट घटक असतात. त्याबरोबरच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे खनिजद्रव्य हि असतात. आज आपण जाणून घेणार आहोत इलायची खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पुरुषांनी रात्री झोपण्याआधी एक इलायची ग्लासभर कोमट दुधासोबत मिसळून नियमितपणे प्यायल्यास शारीरिक कमजोरी निघून जाते. इलायचीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळत सकाळी एक इलायची खाल्याने शरीरातील रक्त परिसंचरण नेहमी सामान्य राहण्यास मदत मिळते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.

जर आपल्या तोंडाला दुर्गंधी येत असेल आणि लोक तुमच्याशी बोलण्यास कचरत असतील तर आपण नियमितपणे एक ते दोन इलायची चघळल्याने आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते.

आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास आपण सकाळी दोन ते तीन इलायची दीड ग्लास पाण्यात उकळून घ्या. नंतर पाणी जरा गार होऊद्या कोमट असतानाच हे पाणी प्या. यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

प्रवासात बऱ्याच जणांना मळमळ होण्याची, उलटी होण्याची समस्या असते. त्यांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी एक इलायची तोंडात ठेवा. असे केल्याने आपल्याला प्रवासात मळमळ किंवा उलटी होणार नाही.

घसा दुखत असल्यास किंवा खोकला येत असल्यास इलायची युक्त मसाला चहा दिवसातून दोन वेळा घेतल्याने घसादुखी कमी व्हायला मदत होते. सकाळी गरम पाण्यासोबत अर्धा चमचा इलायची पूड मिसळून प्यायल्याने कोलेस्ट्रोल कमी व्हायला मदत मिळते.

आपल्याला इलायची खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *