- आरोग्य

खारीक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लहानपणी आपली आई किंवा आजी थंडीच्या दिवसात खारीक आणि खोबऱ्याचे लाडू बनवून ते घरातील लहान मुलांना खायला द्यायची. खारकेचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे त्यावेळी जुन्या माणसाना माहित होते.

ओले खजूर सुकल्यानंतर त्याचे खारकेमध्ये रुपांतर होते. खजूर हे मऊ आणि ओलसर असते. मात्र खारीक हि टणक असते. खारीक हि टणक असली तरी चवीला छान लागते म्हणून बरेचजण खारीक खाणे पसंत करतात.

खारीक नुसती चवीलाच चांगली नसून खारकेचे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. खारकेमध्ये प्रोटीन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम, सेलेनियम सारखी अनेक पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

खारीक खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास सतत डोकेदुखी,थकवा येणे, सतत झोप येणे, कंटाळा येणे अशा गोष्टी होत असल्यास आपण एक महिना सकाळी आणि रात्री एक ग्लास दुधासोबत मुठभर खारीक खाल्याने रक्ताची कमतरता दूर होईल,

नियमितपणे खारीक खाल्याने त्यामधील कॅल्शियम, सेलेनियम अशा घटकांमुळे आपले हाडे, दात, स्नायू मजबूत होतात. आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त घटक असणारे पदार्थ असतील तर पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. खारकेमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे खारीक खाल्याने पोट साफ राहायला मदत होते.

नियमितपणे खारीक खाल्याने त्यामधील पोषक घटकांमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. वाढत्या वयाच्या मुलांना दुधासोबत खारीक खायला दिल्याने त्यांची शारीरिक वाढ चांगल्याप्रकारे व्हायला मदत मिळते.

खारकेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात त्यामुळे नियमित खारीक खाल्याने आपल्या चेहऱ्यावर चमक येईल तसेच केस हि मजबूत आणि चमकदार होतील. पुरुषांमध्ये वीर्याची कमतरता असल्यास नियमितपणे खारीक आणि दुधाचे सेवन केल्याने फायदा होतो.

आपल्याला खारीक खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *