- आरोग्य

चेहऱ्यावर असणारे वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय

त्वचेचा रंग कोणताही असूद्यात पण चेहरा डागमुक्त असणे महत्वाचे असते. चेहऱ्यावर वांग असतील तर ते दिसायला खूप खराब दिसते. आपले नैसर्गिक सौंदर्य कमी होते. चेहऱ्यावर वांग येण्याची अनेक कारण असू शकतात.

जर आपण आपल्या चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेत नसाल, जास्तवेळ उन्हात काम केल्याने सुद्धा आपल्या चेहऱ्यावर वांग येऊ शकतात. त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाची सौंदर्य प्रसाधने वापरल्याने चेहऱ्यावर वांग येऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत. चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी सर्वप्रथम एक लिंबू कापून त्याचा रस एका वाटीत काढून घ्या. त्यामध्ये दोन चमचे मध मिसळून कापसाच्या मदतीने हे आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आहे तिथे लावा.

आणि सुकू द्या. अर्धा तासानंतर चेहरा स्वछ धुऊन घ्या. काही दिवस हा उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील वांग कमी होतील. (आपली त्वचा जर संवेदनशील असेल तर आपण त्यावर लिंबाचा रस लावू नका.)

आपल्या चेहऱ्यावर वांग असतील आणि आपली त्वचा संवेदनशील असेल तर आपण हा उपाय करू शकता यासाठी एक बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यातील रस एका वाटीत काढून घ्या.

त्यानंतर कापसाच्या साहाय्याने हा रस चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आहे त्या ठिकाणी लावा आणि अर्धा तास सुकू द्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. ह्या उपायाने आपल्याला आठ दिवसात फरक दिसू लागेल.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी वेळच्या वेळी आपल्या चेहऱ्याला वाफ देत जा. वाफ दिल्याने चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील. तसेच प्रदूषणामुळे चेहऱ्याला आलेला काळसरपणा हि कमी होईल.

चेहऱ्यावर वांग येऊ नये यासासाठी पुढील प्रकारे आपण काळजी घेऊ शकता. चेहऱ्यावर वांग येऊ नये यासासाठी आपण उन्हात जात असाल तर चेहरा झाकला जाईल अशा प्रकारे स्कार्फ बांधू शकता.

उन्हाच्या अतिनील किरणांच्या प्रभावामुळे आपल्या चेहऱ्यावर वांग येत असतात. आपल्या त्वचेसाठी साधारण २० SPF च्या वर असलेला सनस्क्रीन वापरा. आपल्या आहारात फायबरयुक्त घटक असणारे पदार्थ खा. रात्रीचे जागरण करू नका.

आपल्याला चेहऱ्यावर असणारे वांग घालवण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *