- आरोग्य

हृदयविकार कसा ओळखायचा?

आजकालच्या या धावपळीच्या युगात आपण आपल्याला सगळ्यात महत्वाच्या संपत्तीकडे म्हणजेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पोषक आहाराच्या ऐवजी बाहेरचे तेलकट मसालेदार मैदायुक्त पदार्थ खातो, रात्र रात्रभर जागरण करतो, वेगवेगळ्या केमिकल पासून बनवलेले कोल्डड्रिंक्स पितो, वेगवेगळे व्यसन करतो.

एका जागेवर जास्तवेळ बसून गेम खेळत बसतो या आणि अशा इतर गोष्टींमुळे आपल्याला अगदी कमी वयातच हृदयविकार होण्याचा धोका वाढत असतो. आपल्याला नेमक हेच माहित नसत कि हृदयविकार होण्याच्या आधी आपले शरीर आपल्याला धोक्याची जाणीव करून देत असत पण आपल्याला या गोष्टी बद्दल माहित नसतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हृदयविकार कसा ओळखायचा?

आपण आजाराच्या प्राथमिक अवस्थेतच त्यावर उपचार सुरु केले तर आपण त्या आजारातून लवकर आणि सुखरूपपणे वाचू शकतो म्हणूनच ह्या गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. जर आपल्याला चालल्यावर, जिना चढल्यावर, सायकल चालवल्यावर छातीत सौम्य वेदना होत असतील तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

अचानक डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखे होत असेल, चक्कर येत असेल तर हे सुद्धा हृदयविकाराचे लक्षण असू शकते. श्वास घ्यायला त्रास होणे, थोड काम केल तरी लगेच दम लागणे हे सुद्धा हृदयविकाराचे लक्षण असू शकते. अचानक दरदरून घाम येणे, घाबरल्यासारखे वाटणे हि सुद्धा हृदयविकाराचे लक्षण असू शकतात.

अचानकपणे हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यास शांतपणे पडून राहा. व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवा. पेशंट बेशुद्ध झाल्यास पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास द्या. आपल्या घरामध्ये जर कुणाला हृदय विकाराचा त्रास असेल तर आपण प्रथमोपचार कशा प्रकारे करावे हे शिकून ठेवणे गरजेचे आहे.

यातील तीनपेक्षा जास्त लक्षणे आपल्याला जाणवत असतील तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवले पाहिजे. हृदयविकार टाळण्यासाठी आपण या गोष्टी करू शकता. ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट म्हणजेच चरबी असते ते अन्न खाणं टाळल पाहिजे.

महत्वाचे म्हणजे धूम्रपान करण बंद केल पाहिजे. सकाळी नियमित शारीरिक व्यायाम, योगासने केली पाहिजे. पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्ये, तंतुमय घटक असणाऱ्या भाज्या,फळांचा समावेश केला पाहिजे. यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रोल जमा होणार नाही. आणि आपण स्वताला हृदय विकारापासून वाचवू शकता.

आपल्याला हृदयविकार कसा ओळखायचा ? ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *