- आरोग्य

सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

बऱ्याचदा सरबतामध्ये सब्जाचे बी मिसळून आपण प्यायला असाल. सब्जाचे बी हे काळसर रंगाचे असते तुळशीच्या बीयांपेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे असते. पाण्यामध्ये भिजवल्यावर हे बी फुगून पांढऱ्या रंगाचे होते.

सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते. सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, प्रथिने, लोह असते. आज आपण जाणून घेणार आहोत. सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे 

सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. सब्जाच्या बीयांमध्ये कोणत्याही कॅलरीज नसतात. म्हणून, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आवर्जून सब्जाचे सरबत प्यायले पाहिजे. सब्जाचे सरबत प्यायल्याने चयापचय क्रिया चांगल्याप्रकारे होते.

सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने अपचन, आणि गॅसचा त्रास कमी होतो. बऱ्याचवेळा उष्णतेमुळे लघवी करताना जळजळ वेदना होतात. अशा वेळी सब्जाच्या बियांचे भिजवून सेवन केल्याने उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो.

भिजवल्यानंतर सब्जाच्या बीयांमधून पोषक अँटी ऑक्सिडंट आणि पाचक गुणधर्म बाहेर पडतात. त्यामुळे सब्जाचे बी हे  पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजे. सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने पोटामध्ये थंडावा निर्माण होतो.

आयुर्वेदानुसार सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. पोटात जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात दोन चमचे सब्जाचे बी मिसळून दहा मिनिटे राहूद्या नंतर सब्जाचे बी भिजल्यानंतर ते प्या. आपल्याला आराम मिळेल.

सब्जाचे बी पाण्यात मिसळून प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *