- आरोग्य

जीभेला चिरा पडल्या असतील तर करा हे घरगुती उपाय

बऱ्याच वेळा जीभेवर चिरा पडतात. त्यामुळे असह्य वेदना होतात. गरम पदार्थ, थंड पदार्थाचे सेवन करताना तसेच मसाले पदार्थ, तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर हा त्रास आणखीन वाढू लागतो.

हा त्रास प्रामुख्याने आहारातील पोषक तत्वांची कमतरता, जीवनसत्त्वांचा अभाव, लोहाची कमतरता, औषधाचे साइड इफेक्ट यामुळे होत असतो. आज आपण जीभेला चिरा पडल्यानंतर त्यावर कोणते घरगुती उपाय करता येतील हे पाहणार आहोत.

जीभेला चिरा पडल्यास एक ग्लास पाण्यास एक चमचा मीठ घाला. या पाण्याने दिवसातून ४ ते ५ वेळा गुळण्या करा. असे  केल्याने तोंडातील जखम भरुन येईल. आणि आपल्याला आराम मिळेल.

जीभेला चिरा पडल्यानंतर त्यावर बर्फ लावणे हा एक उत्तम उपाय आहे. जीभेला चिरा पडल्यास बर्फ लावल्यास वेदना आणि जळजळ कमी होते. दिवसभरात दोन ते तीन वेळा जीभेला बर्फ लावल्यास तुम्हाला आराम मिळेल.

जीभेला चिरा पडल्या असतील तर आपण त्यावर कापसाच्या बोळ्याने नारळाचे तेल लावा नारळाच्या तेलामध्ये असणाऱ्या अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांमुळे आपल्या जीभेवरील दुखणे बरे होईल.

जीभेला पडलेल्या  चिरा घालवण्यासाठी तुळशीची तीन ते चार पानं घ्या. ती पाने चघळा. तुळशीच्या पानांतून जो रस येईल तो गिळून टाका. असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा. असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळेल.

जीभेला चिरा पडल्यास कडुलिंबाची पाने ही या समस्येवर रामबाण उपाय आहेत. कडूलिंबाच्या पानांमध्ये रोगनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे चिरा पडलास कमी होतात. कडुलिंबाची दोन-तीन पाने चगळ्यास जीभेला पडलेल्या चिरा कमी होतात. कडूलिंबाची पेस्टही तुम्ही लावू शकता.

जीभेला चिरा पडल्यास त्यावर कोरफड गर लावणे हा एक जीभेला चिरा पडलास चांगला उपाय आहे. कोरफड गर लावल्याने आराम मिळतो. त्याचबरोबर चिरा पडल्यामुळे झालेल्या जखमा लवकर बऱ्या होतात. त्यामुळे कोरफड गर लावणे फायद्याचे आहे.

जीभेला चिरा पडल्यास त्यावर टुथपेस्ट लावणे हा एक चांगला उपाय आहे. टूथपेस्टमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. ज्या भागावर चिरा पडतात त्या ठिकाणी दररोज स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा जखमा होऊ शकतात. जीभेला चिरा पडल्यास दात घासताना जीभ स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसातून एकदा जीभेवर टूथपेस्ट लावा.

परत परत जीभेला चिरा पडत असल्यास आपण तोंडाची आणि जीभेची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. नेहमी दात घासणे, दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. लोहाची कमतरता असल्यास जीभेला चिरा पडतात.

आपल्याला जीभेला चिरा पडल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकता. ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *