- आरोग्य

“सायटिका” मांड्यांचा मागचा भाग व पोटऱ्यांमध्ये वेदना होत असल्यास करा हे घरगुती उपाय

बऱ्याचदा आपण बघितल असेल कि काही लोकांना थोडस अंतर चालल तरी हि  लगेच कंबर, मांड्या आणि पोटऱ्या भरून येतात.  पायांमध्ये कमजोरी आणणाऱ्या या आजाराला सायटिका असे म्हणतात. आज आपण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सायटिका नाडी हि आपल्या मणक्यापासून आपल्या दोन्ही पायामध्ये जाणारी महत्वाची नस असते. अति जास्त वजन उचल्याने, परिश्रम केल्याने, अपघातात कंबरेच्या खालच्या भागात मार बसल्याने हि नस दुखावली गेली असल्यास आपल्याला हा आजार होऊ शकतो.

सायटिका या आजारामध्ये मांडीचा मागचा भाग आणि पोटरीत असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांबरोबरच पायांना  मुंग्या येतात आणि कधी कधी बधीरपणाही येऊ शकतो.

हया आजारावर वेळीच उपाय न केल्यास पायांमध्ये जडपणा येऊन चालणे हि अवघड होऊन जाते. मात्र योग्य वेळी काही व्यायाम आणि आयुर्वेदिक उपाय करून आपण ह्या आजारावर मात करू शकता. त्याची तीव्रता कमी करू शकता.

सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट दुधामध्ये २ लसणाच्या पाकळ्या बारीक करून घाला. आणि एक चमचा मध मिसळून ते दुध प्या. लसून हा वेदनाशामक असतो. हे मिश्रण प्यायल्याने वेदनेची तीव्रता कमी होईल. आपल्याला बरे वाटेल.

मेथीचे दाणे सायटिकाच्या वेदना दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. सायटिकाचा त्रास होत असल्यास सकाळी एक चमचा मेथी दाण्याची पावडर पाण्यामध्ये मिसळून प्या. किंवा एक ग्रॅम मेथी पावडर आणि सुंठ पावडर कोमट पाण्यासोबत दिवसातून २-३ वेळा घ्या असे केल्याने वेदना कमी होऊन आराम मिळेल.

रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिसळून प्या. हळदीमध्ये असणाऱ्या एंटी-इंफ्लैमटोरी गुणधर्मामुळे वेदना कमी व्हायला मदत मिळते.

सायटिकाच्या वेदनापासून मुक्त होण्यासाठी, बाथटबमध्ये दोन मोठे चमचे सैंधव मीठ टाका. मीठ टाकलेल्या कोमट पाण्यात बसल्याने आपल्या पायांना आणि कंबरेला होणाऱ्या वेदना कमी होतील. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करा.

पारिजातकाची पाने हि सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यासाठी आपण 250 ग्रॅम पारिजातकाची पाने धुऊन घ्या. नंतर एक लिटर पाण्यामध्ये हि पाने मिसळून हे पाणी उकळा.

अर्ध्या पेक्षा जास्त पाणी राहिल्यावर गॅस बंद करा. हे पाणी गार होऊ द्या. हा काढा एक कप सकाळी आणि एक कप संध्याकाळी अशा प्रमाणात घ्या. काही दिवस हा काढा घेतल्याने आपल्या सायटीकाच्या वेदना कमी होतील.

सायटिकाच्या वेदना कमी करण्यासाठी आपण भुजंगासन, वायुमुद्रा, मकरासन हि योगासने करू शकता. सायटिका हा आजार टाळण्यासाठी आपण या गोष्टी करू शकता. नियमित सायकल चालवल्याने आपल्या पायाचे स्नायू मजबूत होतात.

तसेच जिना चढल्याने, चालल्याने, पोहण्याचा व्यायाम केल्याने हि आपल्या पायाचे स्नायू मजबूत होतात. या बरोबरच आपल्या आहारात कॅल्शीयमयुक्त गोष्टींचा समावेश असू द्या.

जसे कि सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ, शेंगदाणे यासोबतच गाजर, हिरव्या पालेभाज्या, आंबे आणि जर्दाळू सारखे व्हिटॅमिन-ए असणारे पदार्थ हि खा. उंच टाचा असलेल्या चपला वापरू नका. उंच टाचेच्या चपला वापरल्याने आपल्याला पायाच्या शिरांवर ताण येतो.

आपले काम बसून असेल तर आपल्या कंबरेला व्यवस्थित आधार मिळेल अशा प्रकारे बसण्याची सवय आपण स्वताला लावू शकता. अवजड वजन उचलताना इतरांची मदत घ्या. प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलणे टाळा. ह्या प्राथमिक उपचारांनी आपल्या वेदना जर कमी होत नसतील तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *