- आरोग्य

सर्दी, खोकला, छातीतील कफ यावर घरगुती उपाय

वातावरणात गारवा आल्याने आपण आपल्या आजूबाजूला बघत असाल तर जो तो शिंकतोय, खोकतोय, नाक पुसताना दिसेल. ह्या अशा वातावरणात सामान्यपणे होणारा खोकला, सर्दी टाळणे आपल्याला हि खूप कठीण जात असेल. म्हणूनच आज आपण इन्फोमराठीच्या या माहितीपूर्ण लेखामधून सर्दी, खोकला, छातीतील कफ यावरील घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.

 आपल्याला जर सर्दी, खोकल्यासोबत घसा हि दुखत असेल तर आल्याचा छोटासा तुकडा किसून एक ग्लासभर पाण्यात मिसळून ते पाणी चांगले उकळून गाळून घ्या. हे पाणी कोमट असतानाच त्यामध्ये एक चमचा मध मिसळून दिवसातून दोनवेळा प्या. हा उपाय केल्याने आल्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या घटकांमुळे आपला घसा मोकळा होईल तसेच सर्दी आणि खोकला हि कमी होईल.

सर्दी कमी होण्यासाठी एक ग्लास गरम दुधात थोडीशी हळद पावडर मिसळून हे दूध रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीच्या दुधामध्ये असणाऱ्या अँटीमाइक्रोबियल गुणधर्मामुळे आपली सर्दी कमी होईल. आयुर्वेदानुसार हळदीचे दुध प्यायल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते.

घसा मोकळा होण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून ते पाणी चांगले उकळून गाळून घ्या. कोमट असतानाच त्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. दिवसातून दोनवेळा आपण हा उपाय करू शकता. (हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात असू द्या. दालचिनी हि उष्ण गुणधर्मयुक्त असते. त्यामुळे तिचे अति सेवन करू नका.)

आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण लसून मध खाऊ शकता. यासाठी चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या. त्यामध्ये २ चमचे मध मिसळून रात्रभर ठेवा. दिवसातून दोन वेळा एक चमचा या प्रमाणात हे मिश्रण खा. हे मिश्रण जास्त प्रमाणात खाऊ नका. कारण लसून हा उष्ण गुणधर्मयुक्त असतो.

छातीतील कफ मोकळा होण्यासाठी एक चमचा जेष्ठमधाची पावडर ग्लासभर पाण्यात मिसळून ते उकळून घ्या. नंतर गाळून घ्या. थोडीशी खडी साखर मिसळून गरम असतानाच प्या. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्याने छातीतील कफ मोकळा होऊन आपल्याला आराम मिळेल.

सर्दी कमी होण्यासाठी आपण वाफ घेऊ शकता. तसेच खोकला आणि घसा मोकळा होण्यासाठी आपण गरम पाण्यात मीठ टाकून दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या करा. या प्राथमिक उपायांनी आपल्याला आराम न मिळाल्यास आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांची मदत घ्या.

आपल्याला सर्दी, खोकला, छातीतील कफ यावर घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा.

जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *