रक्तामध्ये बिलीरुबीनचे प्रमाण वाढले कि त्वचा पिवळट दिसू लागते, डोळे पिवळसर दिसू लागतात. कावीळ झाली आहे की नाही हे डोळ्यांचे पिवळे होणे यावरून कळते. कावीळ ही दूषित पाण्यामुळे जास्त प्रमाणात पसरते.
त्यामुळे यकृताचे नुकसान होत जाते. यासाठी आपल्याला काविळची लक्षणे माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण कावीळ होण्याची कारणे सोप्या शब्दात समजून घेणार आहोत.
दूषित अन्न खाणे तसेच दुषित पाणी पिणे हि कावीळ या आजाराची मुख्य कारणे आहेत. म’द्यपान केल्याने यकृताला सूज येऊन आपल्याला कावीळ हा आजार होऊ शकतो.
कावीळचे प्रथम दर्शी लक्षण म्हणजे डोळे पिवळे होते. कावीळ झालेल्या व्यक्तींचे डोळे पिवळे दिसू लागतात. लहान मुलांना कावीळ हा आजार लवकर होतो. त्यामुळे लहानपणी कावीळ होऊ नये यासाठी लस दिली जाते. कावीळ झाल्यावर हात पाय निस्तेज होतात. आणि भूक हि कमी होते.
कावीळचे दुसरे लक्षण म्हणजे डोळ्यांसोबत त्वचा ही पिवळी पडत जाते. शरीरात वाढणारे बिलीरुबीनचे प्रमाण यामुळे यकृतातील लाल पेशी नष्ट होऊ लागतात. त्यामुळे त्वचा पिवळी दिसते. कावीळ झाल्यावर बऱ्याचदा यकृताला सूज येते.
कावीळ झालेल्या व्यक्तींना खाजेची समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींच्या हाता पायांना खाज सुटते. तसेच उलट्या, मळमळ हा त्रास सुरू होतो. झोप लागत नाही. कावीळ झाल्यावर बऱ्याचदा थोडेसे काम केले तरी अति थकवा येतो. कावीळ झाल्यावर बऱ्याचदा पोटदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे कावीळ झाल्यास त्वरित इलाज करणे गरजेचे असते.
आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे कावीळ हा आजार होऊ शकतो ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.